व्यास शिक्षण मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ...
व्यास शिक्षण मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
व्यास शिक्षण मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल येथे दि ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जे टी महाजन इंग्लिश स्कूल च्या प्राचार्या सौ रंजना महाजन मॅडम प्रमुख वक्ता व जे टी महाजन इंग्लिश स्कूलच्या सुपरवायझर गौरी भिरुड मॅडम उपस्थित होत्या प्राचार्य जी जी वाघुळदे उपस्थित होते याप्रसंगी सौ गौरी भिरुड मॅडम यांनी पर्यावरण संरक्षण यावर उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना माहिती दिली तदनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन ऑनलाईन सादर करण्यात आले. नंतर राज्याचे अप्पर सचिव कौशल रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्यचे मा. मनीषा वर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती दिली तर नंतर ऑगस्ट 2025 साठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रिये बाबतची माहिती उपस्थिताना ऑनलाइन देण्यात आली यासोबत प्रशिक्षणार्थ्यांनी तंत्रप्रदर्शन यामध्ये भाग घेतलेल्या प्रोजेक्ट सादर करण्यात आले. याबाबतची माहिती मान्यवरांना प्रशिक्षणार्थ त्यांनी दिली. सूत्रसंचालन श्री आर व्ही फेगडे सर व आभार प्रदर्शन श्री जे एस चौधरी सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व निदेशक व्या शिक्षण मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी सहकार्य केले.

No comments