adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बाल संस्कार विद्या मंदिरात शाळा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न

  बाल संस्कार विद्या मंदिरात शाळा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) बाल संस्कार विद्या मंदि...

 बाल संस्कार विद्या मंदिरात शाळा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

बाल संस्कार विद्या मंदिरात आज रोजी शाळा प्रवेशोत्सव सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सदस्य श्री संतोष भाऊ कवडीवाले,संस्थाध्यक्ष महेश भाऊ वाणी आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री पंकज गडे सर यांनी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि मान्यवरांच्या हस्ते शालेय पाठपुस्तके 365 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. शाळेचे शिक्षक, पालक यांनी नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण केले.


गावात प्रभात फेरी काढून शाळेत येण्याबाबत जागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील माळी सर यांनी केले. श्री अतुल पवार सर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन श्री प्रशांत महाजन सर तर आभार श्री पंढरीनाथ महाले सर यांनी  मानले. गोड पदार्थ देऊन नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत समारंभाचा कार्यक्रम आनंदाने संपन्न झाला.

No comments