सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत विद्यार्थीनीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत, तथा पाठ्यपुस्तकांचे वाटप कार्यक्रम संपन्न श्रीरामपूर / प्रतिनि...
सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत विद्यार्थीनीचे गुलाब पुष्प देऊन स्वागत, तथा पाठ्यपुस्तकांचे वाटप कार्यक्रम संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
अ.नगर येथील मुकूंदनगर मधील मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थीनींना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या विशेष उपक्रमात मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आणि प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. अब्दुस सलाम सर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, हसीब शेख, मुख्याध्यापक नौशाद सैय्यद तसेच असलम पटेल, यास्मिन शेख, फरजाना शेख, शाहीन शेख, सुलताना शेख, हीना शेख, उजमा शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती नव्या शैक्षणिक वर्षाची पुस्तके लवकरात लवकर पोहोचावीत यासाठी शाळा प्रशासनाने विशेष तयारी केली होती. यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रा. डॉ. अब्दुस सलाम सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासाच्या शिस्तीचे आणि वेळेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी पालकांनी शाळेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मुख्याध्यापक नौशाद सैय्यद आणि त्यांच्या संपूर्ण शिक्षकवर्गाचे पालकांनी कौतुक केले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments