छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्थेचं कंत्राट रद्द करा — रोहित झाकर्डे यांचं आदिवासी विकास मंत्र्यांना थेट आव्हान! शिराळा प्रतिनिध...
छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार संस्थेचं कंत्राट रद्द करा — रोहित झाकर्डे यांचं आदिवासी विकास मंत्र्यांना थेट आव्हान!
शिराळा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अखत्यारीतील शासकीय आश्रमशाळांमध्ये नर्स, वाहनचालक आणि बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांच्या एकूण ६४३ कंत्राटी पदां भरती प्रक्रियेवर आता गंभीर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. निवड प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव आणि 'निकटवर्तीयांची भरती' यामुळे आदिवासी समाजात संताप उसळला आहे या भरतीसाठी शासनाने "छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक" या संस्थेची निवड केली असून, तिच्यामार्फत ४९९ नर्स, ७२ क्षेत्रीय पदे, १२ वाहनचालक आणि ६० बहुउद्देशीय कर्मचारी यांची भरती केली जात आहे. विशेष म्हणजे, या संस्थेवर यापूर्वीच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले असूनही, तिलाच पुन्हा जबाबदारी देण्यात आली आहे
या पार्श्वभूमीवर रोहित झाकर्डे यांनी आदिवासी विकास मंत्री यांना थेट इशारा दिला आहे या भरतीतील आर्थिक गैरव्यवहार स्पष्ट आहे. पात्र उमेदवारांना डावलून संस्थेच्या जवळच्या लोकांची आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचीच भरती सुरू आहे. ही भरती तातडीने रद्द करून स्वतंत्र चौकशी न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल
हा प्रश्न केवळ रोजगाराचा नाही, तर आदिवासी अस्तित्वाच्या लढ्याचा आहे,” असे झाकर्डे म्हणाले. काही पदांसाठी लाखो रुपयांची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही प्रक्रिया संपूर्णपणे दोषमुक्त, निष्पक्ष व पारदर्शक व्हावी, अशी आदिवासी समाजाची ठाम मागणी आहे.

No comments