फैजपूर पोलीसांच्या मदतीने शिक्षणार्थी विद्यार्थ्यांला मिळाला लॅपटॉप ! फैजपूर वाहतूक पोलीस पोहेकॉ सलीम तडवींची सतर्कता रावेर प्रतिनिधी ...
फैजपूर पोलीसांच्या मदतीने शिक्षणार्थी विद्यार्थ्यांला मिळाला लॅपटॉप !
फैजपूर वाहतूक पोलीस पोहेकॉ सलीम तडवींची सतर्कता
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर तालुका यावल पोलीस स्टेशनचे हद्दीत दि। 15/06/2025 रोजी दुपारी 2.30 वा. सुमारास अकोला येथे एम.बी.ए.च्या दुस-या वर्षाला शिक्षण घेणारे सोहम सुजितसिंग राजपुत वय 22 रा. इंद्रनगरी सोसायटी अकोला हे त्यांचे आजोबांना भेटण्यासाठी अकोला येथुन भुसावळ येथे रेल्वेने व भुसावळ येथुन ॲपेरिक्षा मधुन फैजपुर येथे येवुन छत्री चौकात उतरले असता त्यांनी त्यांच्या इतर दोन बॅगा काढल्या परंतु त्यांचे 30,000/- रुपये किंमतीचे अॅसुस विवो कपंनीचे लॅपटॉपची बॅग रिक्षा मधुन काढण्याचे विसरले होते. त्यांनी सदर लॅपटॉपचा शोध घेतला परंतु त्यांना लॅपटॉप न मिळाल्याने ते फैजपुर पोलीस स्टेशनला मदत मागण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलीस ठाणे अंमलदार डयुटीस असलेले स. फौ. संजय झाल्टे यांनी सदर बाबत लागलीच प्रभारी अधिकारी रामेश्वर मोताळे साहेब यांना कळवीले असता त्यांनी फैजपुर येथे ट्राफीक ड्युटी करणारे पो. अंमलदार पोहेकॉ सलीम तडवी यांना सदर अॅपेरिक्षावाल्यांकडे सदर बॅगचा शोध घेणे बाबत आदेशीत केले असता पोहेकॉ सलीम तडवी यांनी लागलीच सदर अॅपेरिक्षा संघना अध्यक्ष तसेच अपेरिक्षा चालक यांचेकडुन माहिती घेवुन सदर लॅपटॉपची बॅग नजर चुकीने घेवुन जाणारे मुकेश तिरोले रा. नहालदरी जि. खरगोन (मध्यप्रदेश) यांचेकडुन प्राप्त केलेली आहे. व सदरचा लॅपटॉप हा आज दिनांक 16/06/2025 रोजी सोहम सुजितसिंग राजपुत या विदयार्थास परत करण्यात आला आहे. त्यामुळे तो आनंदीत होवुन त्याने पोलीसांचे आभार मानुन खुप खुप धन्यवाद दिलेले आहे.
No comments