adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आंतरराष्ट्रीय योग दिन बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय यावल शाळेत मोठ्या उत्साहात साजरा

आंतरराष्ट्रीय योग दिन बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय यावल शाळेत मोठ्या उत्साहात साजरा भरत कोळी यावल ता प्रतिनिधी  (संपादक -:- ...

आंतरराष्ट्रीय योग दिन बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय यावल शाळेत मोठ्या उत्साहात साजरा


भरत कोळी यावल ता प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय यावल शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लीए योग या थीमवर आधारित योगासने, प्राणायाम, आनंददायी गाणे विद्यार्थ्यांनी श्री प्रशांत महाजन व श्री नितीन बारी सर यांच्या मार्गदर्शनात केले. योग करताना मन, शरीर आणि आत्मा यांची योग्य सांगड कशी घालावी याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील माळी यांनी विद्यार्थ्यांना सुचित केले. सदर कार्यक्रमात मनोगत माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री अतुल गर्गे सर यांनी केले. सर्व शिक्षक बंधुभगिनी यांनी कृतीयुक्त सहभाग घेतला. योग दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री महेशभाऊ वाणी उपस्थित होते. श्री नारायण मार्तंड सार्वजनिक वाचनालय यावल यांच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात वाचनालयाचे श्री महेश सराफ यांनी तसेच सर्व संचालक मंडळ यांनी सहकार्य केले. योग करतांना विद्यार्थ्यांनी योगाचा आनंद घेतला

No comments