यावल महाविद्यालयात "आंतरराष्ट्रीय योग दिन" साजरा भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल :- येथील जळगाव...
यावल महाविद्यालयात "आंतरराष्ट्रीय योग दिन" साजरा
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :- येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली "आंतरराष्ट्रीय योग दिन" साजरा करण्यात आला.
यात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार होते. प्रमुख वक्ते यावल येथील योग मार्गदर्शक सौ. सुरेखा काटकर होत्या.
यात प्रमुख वक्ते सौ. सुरेखा काटकर यांनी "योगाचे महत्त्व" या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की योगा हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. योग, प्राणायाम व ध्यान हे जीवनात अत्यंत उपयुक्त आहेत. योग व ध्यान मुळे मन एकाग्र होऊन मनाची कार्यक्षमता वाढते. मन व शरीर सुदृढ ठेवायचे असेल तर योग प्राणायाम ध्यान दररोज करणे क्रमप्राप्त आहे. दिनचर्याच्या अनमोल नोंदी त्यांनी आपल्या भाषणात सांगितल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी सांगितले की, योगाची सुरुवात प्रथम भारतात ऋषीमुनींनी केलेली आहे. आज योगाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेले आहे. अनेक देशांमध्ये योगाचे महत्त्व वाढलेले आहे. प्रत्येकाने शरीर व मन सुदृढ ठेवण्यासाठी योगा केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. पी. कापडे यांनी केले तर आभार डॉ. आर. डी. पवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉ. एच. जी. भंगाळे, मनोज पाटील, प्रा. सोनाली पाटील, प्रा. सी. के. पाटील प्रा. आर. एस. ठिगडे, प्रा. प्रशांत मोरे, मिलिंद बोरगडे, प्रमोद कदम, संतोष ठाकूर, अनिल पाटील, प्रमोद जोहरे, रमेश साठे, प्रमोद भोईटे, आदी उपस्थित होते.

No comments