पाल आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त चैतन्य साधकांची बैठक रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील पाल येथी...
पाल आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त चैतन्य साधकांची बैठक
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील पाल येथील परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम वृंदावन धामात दि ११ जून रोजी संत कबीर जयंती च्या पौर्णिमेचे औचित्य साधून जुलै महिन्यात येणाऱ्या गुपौर्णिमेनिमित्त विद्यमान गादीपती श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात चैतन्य साधकांची बैठक संपन्न झाली.
सालाबादाप्रमाणे येणारी गुरुपौर्णिमा यंदाही जुलै महिन्यात ११ तारखेला असून या भव्य व दिव्य महोत्सवात देशभरातून किमान तीस ते पस्तीस हजाराच्या वर भाविक भक्त पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रमात स्थित श्री हरिधाम मंदिरातील गुरुवर्य परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधी दर्शन व पादुका पुजनाकरिता येतात. तर हे महोत्सव दोन दिवसा पर्यंत असते. त्याकरिता येणाऱ्या भाविकासाठी भोजना पासून तर निवास, दर्शन, सत्संग, आरोग्य, पार्किंग, जल, स्वच्छता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलीस संरक्षण, विज पुरवठा, एसटी सेवा या व्यवस्थेकरिता एक महिन्या आधीपासून साधकांना सेवा कार्याला लागावयाचे असते या साठी अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराची ही बैठक ठेवण्यात आली. या मध्ये साधक सह आश्रम समर्पित बम्हचारी उपस्थित होते. तसेच दर महा पौर्णिमा निमित्त विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराजांच्या रसाळ अमृत वाणीतून निघणाऱ्या सत्संग अमृताचा लाभ भाविकांनी घेतला यामध्ये श्रधेय महाराज यांनी मनुष्याच्या जीवनात नियम असणे अत्यंत गरजेचे असून जसे पशु प्राणी कधीही नियमाचे उल्लंघन करीत नाही तसेच मनुष्याने सुद्धा करू नये. आणि जो व्यक्ती ईश्वर स्वरूपाचे निरंतर चिंतन करितो तोच श्रद्धावान असतो व त्याने वेद आणि शाश्रा चा आदर करून गुरुवर विश्वास ठेवावा. त्यानंतर कवि छोटूलाल चव्हाण यांच्या हर्षयोगी काव्यसग्रहाचे लोकार्पण संतांच्या हस्ते अध्यात्मिक वातावरणात करण्यात आले तसेच पौर्णिमेची भोजन प्रसादी सोयगाव समिती तर्फे करण्यात आली असून आरती नंतर साधकांनी सात्विक सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.


No comments