adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बारी समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

  बारी समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथे स...

 बारी समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथे सुमाई मंगल कार्यालयात रविवारी बारी समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती माता व संत रूपलाल महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. 


विद्यार्थ्यांच्या या गुण गौरव सोहळा कार्यक्रम अध्यक्षस्थानी भुसावल येथील नागवेल पान व्यवसायिक शिवाजी एकनाथ पाटील प्रामुख्याने उपस्थित होते त्या प्रमुख मान्यवर म्हणून सहाय्यक फौजदार अर्जुन काशिनाथ लावणे,नाशिक बारी पंचमंडळ अध्यक्ष एकनाथ आडबाल,माजी नगराध्यक्ष तुकाराम बारी,ॲड.गोविंद बारी,पुंडलिक बारी,सुनील बारी,डॉ.सतीश आस्वार,प्रा.अनिल बारी,उद्योजक प्राजक्त पाटील,शिवसेना यावल शहरप्रमुख पंकज बारी,नितीन बारी,रितेश बारी उपस्थित होते. बारी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी ई. ६ वी ते १२ वी पर्यंतचे सर्व उत्तीर्ण विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.तसेच इतर विविध क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवरांचा सुद्धा बारी समाजाने सत्कार केला.यावल तालुक्यातील प्रगतशील शेतकरी अशोक बाबुराव अस्वार,गोपाळ बाबुराव पाटील यांचा सत्कार झाला.

अत्यावश्यक सेवेत काम करणारे प्रवीण भाऊराव भुते (Ambulance १०८ कर्मचारी ) नरेंद्र देवराम बंदोळे (बारी) सर्पमित्र म्हणून गौरवण्यात आले.समाजातील शासकीय सेवेत काम करणाऱ्या महिला दिपाली संतोष गारोडी कोतवाल तलाठी कार्यालय न्हावी ता. यावल रेणुका दीपक दामघर (बारी) MTS Post Office Bhusawal यांचा देखील सत्कार करण्यात आला.

राज्य स्तरीय वही गायन पुरस्कार प्राप्त बाळू यशवंत पाटील यांचा सत्कार केला.समाजातील पत्रकार- संतोष पुनमचंद गारोडी,संजय पुनमचंद गारोडी न्हावी ता.यावल. यांचाही सत्कार झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गारोळे,संगीता भुते,मयुरी बारी यांनी केले तर नितीन बारी यांनी आभार मानले.

गुणगौरव सोहळा यशस्वीतेसाठी समस्त बारी समाज यावल तालुका यांच्या सहित राजू काळे,विलास बारी,नितीन बारी,शरद वराडे, नामदेव बारी,विजय खलसे,रितेश बारी,लक्ष्मण आस्वार,भूषण बारी, मनीष कोल्हे रुपेश कोल्हे इत्यादी सामाजिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले तसेच समस्त बारी समाज यावल तालुका, नागवेली बारी युवा फाऊंडेशन, यावल,जय नागवेली मित्र मंडळ, यावल बारी समाज विकास मित्र मंडळ,यावल बारी समाज महिला मंडळ,यावल बारी समाज विकास महिला मंडळ यावल यांनी सहकार्य केले

No comments