सावदा पोलिसांचे अनोळखी महिला मयताची ओळख पाठविण्याचे आवाहन रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सदरची महिला ही तासखेडा ...
सावदा पोलिसांचे अनोळखी महिला मयताची ओळख पाठविण्याचे आवाहन
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सदरची महिला ही तासखेडा शिवारात रेल्वे ट्रॅक जवळील शेतात बेवारस मयत स्थितीत मिळून आली असून मयत महिले जवळच प्लास्टिकच्या बाटल्या भरलेली पिशवी म्हणून आली असून ती महिला प्लास्टिकच्या बाटल्या जमा करणारी दिसत आहे या मयत महिलेस कोणी ओळखत असल्यास सावदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधनेचे आवाहन करण्यात येत आहे याप्रकरणी
सावदा पोलीस स्टेशन ला मधुकर गभीर चौधरी वय 73 धंदा-शेती रा. तासखेडा ता. रावेर. जळगाव यांनी समक्ष पोलीस स्टेशन येथे हजर होवुन खबर दिली की, मी वरील ठिकाणी माझे परीवारासह राहतो माझे तासखेडा गावी तासखेडा शिवारात दिड एकर शेत असुन त्याचा शेत गट नंबर 191 असा आहे. सदरचे शेत हे मी विनोद देवीदास पाटील रा. सुनोदा ता. रावेर यांना नफ्याने करण्यासाठी दिली आहे
सविस्तर वृत्त असे की दिनांक-09/06/2025 रोजी मी माझ्या कडे कामास असलेला मधुकर रघुनाथ चौधरी रा.सुनोदा ता. रावेर यास मी शेतात ट्रॅक्टर घेवुन जा व रोटर करुन कपासी पिकासाठी स-या पाडून घे असे सागीतल्या नंतर तो घरुन ट्रॅक्टर घेवून शेतात गेला होता. त्यानंतर विनोद , देवीदास पाटील यांचा मला अंदाजे सकाली 09.30 वाजता फोन आला व त्यांनी सांगीतले की, नीचे वय अदाजे 55 ते 60 असे आहे. तरी तुम्ही लवकर शेतात या असे सागीतल्यावर मी लागलीच आपल्या शेतात रेल्वे लाईन कडील कोप-यावर एक वयस्कर महीला मयत अवस्थेत पडलेली आहे. तासखेडा गावाचे पोलीस पाटील श्री लिलाधर पाटील यांना फोनवरुन माहीती दिली व स्वता शेतात जावून पाहीले असता तेथे एक अनोळखी महीला वय अंदाजे 55 ते 60 ही मयत स्थितीत पडलेली होती तीच्या अंगात पांढरे रंगाचे व त्यावर सोनेरी पट्टे असलेली मळकट ब्लावुज तसेच कमरेस पांढरे रंगाचे त्यावर हिरवट रंगाचे नक्षी असलेली लुगडे (साडी) हातात भगव्या व लाल रंगाच्या बागड्या नाकात व कानात पिवळ्या धातुचे नथ व कर्ण फुटलेले दिसत आहे. सदरच्या महीले बाबत आम्ही आजु बाजुचे रहीवासी ठिकाणी विचारपुस केली असता तिचे नाव, गाव समजुन आले नाही. सदरची महीला ही कशामुळे मरण पावली या बाबत मला काहीही माहीती नाही. तरी सदर मयत महिलेचे ओळख पटविण्याचे आवाहन सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनी केले आहे
सावदा पोलीस स्टेशन
ठाणे अंमलदार
संपर्क 02584 222043 सावदा पोलीस स्टेशन
7387456555 यांचेशी संपर्क साधावा
No comments