Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रलंबित समस्या तात्काळ सोडविणेबाबत बैठक संपन्न

  चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रलंबित समस्या तात्काळ सोडविणेबाबत बैठक संपन्न  चोपडा प्रतिनिधी (...

 चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रलंबित समस्या तात्काळ सोडविणेबाबत बैठक संपन्न 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चोपडा मतदारसंघातील प्रलंबित समस्या तात्काळ सोडविणेबाबत बैठक आयोजित करणेसाठी विनंती केली  होती.त्यानुसार आज दिनांक १७/०६/२०२५ रोजी मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती त्यात चोपडा मतदारसंघातील यावल तालुक्यातील १३ गावांना फायदेशीर अशा यावल उपसा सिंचन योजनेसाठी स्थायी समितीने जी परिगाणिके  निश्चीत केली होती त्यानुसार यांत्रिकी व विद्युत विभागाकडून अंदाजपत्रके तत्काळ तयार करून पाठवावीत अशी मागणी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केली यावेळी मंत्री गिरीश महाजन व अप्पर मुख्य सचिव दिपक कपुर साहेब यांनी २० दिवसाच्या आत यावल उपसा सिंचन योजनेचा तृतीय सुप्रमा अहवाल राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांचेकडे सादर करण्याचे आदेश दिले.यामुळे चोपडा मतदारसंघातील साकळी, नावरे,विरावली,महेलखेडी,कोरपावली,दहिगाव,वाघोदे,चुंचाळे,गिरडगाव,वढोदे,दगडी,बोराडे,शिरसाड या गावातील ४६१९.१३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.तसेच निम्न तापी पाडळसरे प्रकल्पा अंतर्गत उपसासिंचन योजनेतुन चोपडा तालुक्यातील फक्त २५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून ही सिंचन क्षमता १०,००० हेक्टर पर्यंत वाढवावी अशी आग्रही मागणी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी बैठकीत केली यावेळी मंत्रीमहोदयानी उपस्थित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले.आदिवासी बांधवांसाठी प्रस्तावित ल.पा.प्रकल्प लंगडाअंबा साठी एक विशेष बाब म्हणून पाणी उपलब्धता प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केली असता मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक कार्यवाही करणेबाबत आश्वासित केले.या बैठकीसाठी यावल रावेरचे आमदार अमोल दादा जावळे,मुख्य अभियंता मिलींद बोरकर,सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही.डी.पाटील,अधिक्षक अभियंता गोकुळ महाजन,एस.आर.भोसले,कार्यकारी अभियंता वाय.एम.कडलग उप अभियंता कामेश पाटील,यांसह मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते

No comments