adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पत्रकारांना धमकी आणी हल्ल्याचा राज्य पत्रकार संघाकडून निषेध ; राज्य पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन

  पत्रकारांना धमकी आणी हल्ल्याचा राज्य पत्रकार संघाकडून निषेध ; राज्य पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन डिजिटल...

 पत्रकारांना धमकी आणी हल्ल्याचा राज्य पत्रकार संघाकडून निषेध ; राज्य पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन

डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जिवे मारण्याची मिळालेली धमकी आणि न्युज 18 लोकमतचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांचेवर झालेल्या हल्याच्या निषेधार्ह दिले निवेदन 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जिवे मारण्याची मिळालेली धमकी तसेच न्युज 18 लोकमतचे जुन्नर प्रतिनिधी सचिन तोडकर यांचेवर वृत्तांकन करताना झालेल्या हल्याच्या निषेधार्ह तसेच आरोपींवर कारवाई होणे बाबत अहिल्यानगर चे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वतीने प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव अरोटे यांनी निवेदन दिले. आहे. यावेळी अहिल्यानगर डिजीटल मीडिया जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड आणि राज्य पत्रकार संघाचे पारनेर तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे हे उपस्थित होते. सिद्धार्थ भोकरे यांनी आपल्या दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रातून असे म्हटले होते की, पाकिस्तान मधील क्रिकेट खेळाडू जसे पाकिस्तान प्रेम दाखवतात तसे प्रेम बॉलीवूडमधील खान बंधू अभिनेते आपल्या देशाबद्दल उपडपणे भारत प्रेम का दाखवत नाही? आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत असे खान बंधूंनी देखील देशप्रेम दाखवायला हवं होतं.... असे वृत्त प्रसिद्ध होताच काही अज्ञात इसमांनी निनावी पत्राद्वारे, तू आठ दिवसात माफी माग अन्यथा तुला गोळीबार करून उडवून देऊ अशी धमकी दिली आहे.

या धमकीचा राज्य पत्रकार संघाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत असून, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सिद्धार्थ भोकरे यांना पोलिस संरक्षण देऊन तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच सचिन तोडकर यांनी जुन्नर तालुक्यातील नारायणगांव याठिकाणी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी विशेष बातमी न्यूज 18 लोकमत वर दाखवली होती. या बातमीत खाजगी एजंटांकडून कामगारांची आर्थिक लूट, मोफत मिळणाऱ्या वस्तूंसाठी पैसे वसूल करणे आणि शिष्यवृत्तीतील भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकार उघड झाले होते. या बातमीनंतर प्रतिनिधीच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. वाहनाच्या काचा फोडल्या असून असून, ही घटना पत्रकारांवरील हल्ल्याचा गंभीर प्रकार आहे.

 या दोन्ही घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे कठोर शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संबंधित हल्लेखोर आणि धमकी देणाऱ्यांवर तातडीने पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे - डॉ.आरोटे

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने या दोन्हीं घटनांच्या विरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना तातडीने सुरक्षा पुरवली जावी. तसेच न्यूज 18 लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर वृत्तांकन करताना झालेला हल्ला म्हणजे पत्रकारांवरील दडपण आणि हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत स्वीकार्य नाही.

"पत्रकारांचे काम म्हणजे लोकांचे विचार मांडणे आणि सत्य बोलणे. पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. "भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.  डॉ.विश्वासराव अरोटे (प्रदेश सरचिटणीस) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मिडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments