adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घोडगाव उप सरपंचपदी किशोर दुसाने बिनविरोध

  घोडगाव उप सरपंचपदी किशोर दुसाने बिनविरोध चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा (दि५) - तालुक्यातील घोडगाव येथील किशोर यशवंत द...

 घोडगाव उप सरपंचपदी किशोर दुसाने बिनविरोध


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा (दि५) - तालुक्यातील घोडगाव येथील किशोर यशवंत दुसाने यांची घोडगाव ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सरपंच इंदुबाई श्यामदास भिल यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक उपेंद्र पाटील ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सभेचे कामकाज पाहिले.

किशोर दुसाने यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमताने बिनविरोध निवड केल्याने ग्रामसेवक यांनी अध्यक्षांच्या परवानगीने घोषित केले.सदर निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जयवंत सुधाकर पाटील,महेंद्र पाटील आसिफ शेख,पंढरीनाथ पारधी,चेतन पाटील,माजी सरपंच दिलीप एकनाथ कोळी, सुनील कोळी, प्रदीप पाटील,रामकृष्ण कोळी,मोहन कोळी,प्रवीण कोळी,रघुनाथ पाटील,भैय्या जेसीबी सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी मेहनत घेतली व खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली.निवडणुकीनंतर गावातील ग्रामस्थांनी किशोर दुसाने यांचा सत्कार केला.

अरुणभाई गुजराथी,चोसाका व्हा.चेअरमन शशिकांत देवरे यांनी फोनवरून अभिनंदन केले आहे.

No comments