प्राचार्य डॉ. सचिन नारखेडे यांचे कार्याचा गुजरात मध्ये सत्कार समारंभ इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील डा सचिन...
प्राचार्य डॉ. सचिन नारखेडे यांचे कार्याचा गुजरात मध्ये सत्कार समारंभ
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील डा सचिन भास्कर नारखेडे हे स्वामींनारायन फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य असून
देवमोगरा (जि. नर्मदा) श्री स्वामिनारायण ज्ञानपीठ (यू.एस.ए.) यांच्या वतीने २६ मे २०२५ रोजी देवमोगरा येथे भव्य हिंदू भक्त संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ८०० हून अधिक संत, महंत, आदिवासी भक्त आणि समाजसेवक उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत प्राचार्य डॉ. सचिन भास्कर नारखेडे (प्राचार्य, स्वामिनारायण फार्मसी कॉलेज, सालव), डॉ. शैलेश लुहार, आणि मि. हितेन उपाध्याय यांचा सत्कार "सन्मानपत्र" देऊन त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्या बद्दल गौरव करण्यात आला. सत्कार पूज्य स्वामी कपिलजीवनदासजी स्वामी (श्री स्वामिनारायण गुरुकुल, सालव), श्री प.पू. नौतम स्वामीजी (वडताल), आणि श्री प.पू. पुराणी स्वामीजी यांच्या हस्ते झाला.
डॉ. सचिन नारखेडे यांनी भारतीय संस्कृतीशी जोडलेल्या आध्यात्मिक मूल्यांची आधुनिक शिक्षणात भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. तसेच, आदिवासी व ग्रामीण भागातील युवक शाखेच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
कार्यक्रमात पू. नूतन स्वामीजी यांनी “कलियुगात सर्वात श्रेष्ठ साधना म्हणजे भक्ती” असे सांगितले, तर खासदार मनसुखभाई वसावा यांनी आदिवासी समाजाने धर्म आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचा समारोप “सेवा, संस्कार आणि समर्पण” या त्रिसूत्री संकल्पासह करण्यात आला आणि महाप्रसाद व "जय स्वामिनारायण" च्या गजरात हा कार्यक्रम संपन्न झाला. सचिन नारखेडे यांचे आ अमोल जावळे क ब चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे शरद महाजन अनिल नारखेडे सुनील नारखेडे भास्कर नारखेडे यांनी अभिनंदन केले आहे.

No comments