स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..बंदुकीतून फायरिंग करणारे सहा आरोपी 24 तासाच्या आत जेरबंद सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायक...
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई..बंदुकीतून फायरिंग करणारे सहा आरोपी 24 तासाच्या आत जेरबंद
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.२):- जिल्ह्यातील जामखेड येथे दोघां तरूणावर फायरिंग करणाऱ्या 6 आरोपींना 24 तासाचे आत जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,यातील फिर्यादी आदित्य बबन पोकळे,वय 20, रा.पोकळेवस्ती, जामखेड, ता.जामखेड,जि.अहिल्यानगर व साक्षीदार यांचे अनोळखी आरोपीतांसोबत रस्त्यांवर लघवी करण्याचे कारणावरून वाद झाले.यातुन आरोपीतांनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाथाबुक्क्यांने मारहाण केली.तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांचे दिशेने तीन गोळया फायर केल्या त्यापैकी दोन गोळया हुकल्या व एक गोळी फिर्यादीचा मित्र कुणाल बंडू पवार,रा.पोकळेवस्ती, जामखेड याचे पायास लागली.याबाबत जामखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.293/2025 बीएनएस कलम 109, 115 (2), 352, 3 (5) सह आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ गुन्हयाचा तपास करणेबाबत आदेश दिले.त्यानुषंगाने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात,पोसई/अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार अतुल लोटके,शाहीद शेख,संदीप दरंदले,रोहित येमुल, किशोर शिरसाठ,गणेश धोत्रे, संतोष लोढे,फुरकान शेख, विजय ठोंबरे,सागर ससाणे, अमृत आढाव,रोहित मिसाळ, प्रशांत राठोड,भगवान धुळे अशांचे दोन पथक तयार करून गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले. दि.02 जून 2025 रोजी पथक गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रभु रायभान भालेकर,रा.निपाणी, संभाजीनगर व त्याचे साथीदारांनी केला असून ते प्रवरासंगम,ता.नेवासा मार्गाने किया सेल्टॉस व मारूती FRONX अशा कारमधुन जात असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता.नेवासा येथे सापळा रचुन 1) प्रभु रायभान भालेकर, वय 33, रा.निपाणी, छत्रपती संभाजीनगर 2) नकुल विष्णु मुळे, वय 40, रा.खेर्डा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर 3) शरद अंकुशराव शिंदे, वय 38, रा.पुसेगाव, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर 4) गणेश गोविंद आरगडे, वय 30, रा.खंडाळा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर 5) रावबहादुर श्रीधर हारकळ, वय 35, रा.सारासिध्दी सोसायटी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर 6) सुशील ताराचंद गांगवे, वय 30, रा.पद्मपुरा, छत्रपती संभाजीनगर अशांना ताब्यात घेतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून किया सेल्टॉस कार क्रमांक एमएच-20-एफपी-6622 व मारूती सुझुकी कार क्रमांक एमएच-20-जीके-5586 असे वाहन व आरोपी नामे प्रभु रायभान भालेकर याने गुन्हयात वापरलेले लायसन्सचे पिस्टल, 01 राऊंड व 02 रिकाम्या पुंगळया असा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी प्रभु रायभान भालेकर हा त्याचे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्याचे साथीदारासह भूम जि.उस्मानाबाद येथे गेला होता.वाढदिवस झालेनंतर जामखेड मार्गाने जात असताना रस्त्याचे कडेला लघवी करण्याचे कारणावरून त्याने त्याचेकडील शस्त्र परवाना असलेल्या पिस्टलमधुन फायरिंग केल्याची माहिती सांगीतली.ताब्यातील आरोपीतांना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येत असून,गुन्हयांचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक व श्री.गणेश उगले, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments