वंचित बहुजन आघाडी नाशिक पुर्व जिल्हा.विभागाची निवडणूक आढावा बैठक उत्साहात संपन्न मालेगाव/नाशिक प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) नाशिक प...
वंचित बहुजन आघाडी नाशिक पुर्व जिल्हा.विभागाची निवडणूक आढावा बैठक उत्साहात संपन्न
मालेगाव/नाशिक प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
नाशिक पुर्व जिल्हा.विभागातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी नाशिक पुर्व जिल्हा वतीने एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक मालेगांव तालुका महासचिव.सिध्दांत उशिरे.यांच्या अध्यक्षतेखाली मालेगांव शासकीय विश्रामगृह कॅम्प येथील संपन्न झाली.
या बैठकीत व्यापक प्रमाणात सदस्यता मोहिम राबविण्यात येईल मालेगांव या तालुक्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवडणुकीच्या अनुषगाने लवकरच जिल्हा मेळावा आयोजित करून त्यात शेकडो इतर धर्मीयांचा प्रवेश सोहळा साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्याचा ठराव करण्यात आला नाशिक पूर्व जिल्ह्यातील प्रत्येक गावात आंबेडकरी मिशन पोचविण्याचा संकलप घेण्यात आला
या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पुर्व जिल्हा संघटक समाधान देवरे.मालेगांव तालुका मा.अध्यक्ष सुनिल अहिरे.जिल्हा.नेते किरण मगरे.युवा शहराध्यक्ष सचिन अहिरे.तालुका सचिव.सलिम शेख.तालुका.संघटक अक्षय म्हसदे.तालुका उपाध्यक्ष विनोद जगताप. उत्तर महाराष्ट्र नेते आनंद आढाव.जिल्हा.नेते अॅड गौतम अहिरे.संतोष शिंदे.सिध्दार्थ मगरे.राजु जाधव.केदार बागुल.सतिष मगरे.सटाणा तालुकाचे योगेश सावळे. यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या प्रसंगी अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली
निवडणुकीच्या तयारीसाठी गावागावात घोंगडी बैठका आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपरिषदांसाठी गण/गट व वार्डनिहाय कार्यकारिण्या तात्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस नाशिक पुर्व जिल्हा.आय.टी.प्रमुख मुकेश खैरनार सनी म्हसदे.आनंद जोगदंड.मनोज वाघ.संदिप बागुल.सम्राट वाघ.राकेश शिंदे.आनंद निकम.रितेष अहिरे.समाधान जगताप.संकेत खरात.अशोक मोरे.नंटी महिरे.विजय पगारे.नाशिक पुर्व जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments