adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सकाळची तळणी ते मलकापूर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी! _ग्रामपंचायत ठराव घेऊन गावकरी, विद्यार्थी तथा शिवसेना मलकापूर यांचे आगर प्रमुखांना निवेदन_

  सकाळची तळणी ते मलकापूर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी! _ग्रामपंचायत ठराव घेऊन गावकरी, विद्यार्थी तथा शिवसेना मलकापूर यांचे आगर प्रमुखां...

 सकाळची तळणी ते मलकापूर नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी!

_ग्रामपंचायत ठराव घेऊन गावकरी, विद्यार्थी तथा शिवसेना मलकापूर यांचे आगर प्रमुखांना निवेदन_ 


(मलकापूर/प्रतिनिधी)- 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सकाळची तळणी ते मलकापूर नियमित बससेवा सुरू करण्यासाठी २ मे मलकापूर आगार प्रमुख मुकुंद न्हावकर यांना ग्रामपंचायतचा ठराव घेऊन निवेदन देण्यात आले. तळणी येथील विद्यार्थी तसेच काही कामानिमित्त दवाखान्यात जाणारे‌ प्रवासी त्रस्त झाले आहेत. सकाळची नियमित बससेवा नसल्याने विद्यार्थ्यांना शिकवणी साठी जाण्यास उशीर होत आहे. तळणी येथील विद्यार्थ्यांना क्लासेसाठी तळणी ते दाताळा, मलकापूर येथे ये-जा करण्यासाठी शेलापूर पर्यंत पायदळ जावे लागते. तसेच लग्न सराई किंवा दवाखान्यासाठी नागरिकांना शेलापूर पर्यंत पायदळ कसरत करावी लागते. परिणामी गावातील नागरिकांना खाजगी वाहनाने जादा भाडे देऊन ये-जा करावी लागत असल्याने मोठ्या प्रमाणात जादा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. तरी सव्वा आठ वाजेची माकोडी ते मलकापूर येणारी बस वापस पिंप्री गवळी पर्यत जाते तरी ही बस पिंप्रीगवळी वरून येतांना तळणी मार्गे पाठवण्यात यावी किंवा सकाळीची तळणी ते मलकापूर येणारी बस नियमित पाठवण्यात यावी अशी मागणी आगर प्रमुखांकडे समस्त ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायतचा ठराव घेऊन करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी मलकापूर उबाठा तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील, पत्रकार गणेश वाघ, संजय नारखेडे, राजेंद्र काजळे, गणेश सुशीर, साहिल रायपुरे, ऋषिकेश खराटे, महेश रायपुरे, अनिल खराटे, ऋषिकेश जोशी, स्वप्नील बोंडे, सुपडा गावंडे, नामदेव नाफडे, प्रतिक वराडे, सुरेश पवार, गणेश उंबरकर, बाबुराव निकम, स्वप्नील ब-हाटे यांच्यासह गावकरी, विद्यार्थी, व शिवसैनिक उपस्थित होते. ___________________________

विद्यार्थ्यांना शेलापूर पर्यंत जावे लागते पायदळ

सकाळची बस नसल्याने खासगी शिकवणीसाठी जाणारे विद्यार्थी शेलापूरपर्यंत पायदळ जावे लागते. दररोज २५ ते ३० विद्यार्थी तळणी येथील असून, त्यांना पायी चालत शेलापूरपर्यंत जावे लागते. तसेच नागरिकांना सुध्दा हॉस्पिटल किंवा बाहेरगावी जाण्यासाठी सकाळीची बस नसल्याने मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे गावात येणारी बससेवा नियमित सुरु करावी, ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

No comments