साखरपुड्याची आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून एका कुटुंबातील पाच जणांना मारहाण,एक गंभीर, महिलेचा विनयभंग. यावल पोलिस ठाण्यात सात जणाविरूध्द...
साखरपुड्याची आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून एका कुटुंबातील पाच जणांना मारहाण,एक गंभीर, महिलेचा विनयभंग.
यावल पोलिस ठाण्यात सात जणाविरूध्द गुन्हा दाखल.
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :शहरातील बोरावल गेट भागातील एका कुटुंबाने साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याच्या कारणावरून सात जणांनी त्यांच्याशी वाद घातला व महिलेचा विनयभंग करीत पाच जणांना मारहाण केली. यातील एक जण हा गंभीर आहे. तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.
शहरात बोरावल गेट भाग आहे. या भागातील रहिवासी एका कुटुंबातील मुलीचा साखरपुडा कोरपावली ता.यावल येथे पार पडला. तर या साखरपुड्याच्या कार्यक्रमात आमत्रंण दिले नाही या कारणावरून सोमवारी रात्री सशंयीत आरोपी मुसा मजीद पटेल, आरिफ उर्फ पप्पू मुसा पटेल, हुसेन मुसा पटेल, मीना मुसा पटेल, जावेद मुनाफ पटेल,अनिसा जावेद पटेल व यास्मिन जावेद पटेल यांनी हातात लाकडी लाठया -काठयानी सदर कुंटुबीयाच्या घरात बळजबरीने घुसून यांना लाकडी काठ्यांनी डोक्यावर वार करीत जबर मारहाण केली. व महीलेचा विनयभंग केला. या हाणामारीत सदर कुटुंबातील महिला पुरूष असे पाच जण जखमी झाले तर एक ४३ वर्षीय इसम हा गंभीर जखमी झाला. त्यास प्रारंभी यावल ग्रामिण रूग्णालय व नंतर गोदावरी फाॅऊडेशनच्या डॉ. उल्हास पाटील हॉस्पिटल मध्ये उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. तर या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गंभीर जखमी ४३ वर्षीय इसमाच्या शालकाने दिलेल्या फिर्यादी वरून दंगलीसह विनयभंग व आदि कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहेत.

No comments