adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पहिली वर्गाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरू

  पहिली वर्गाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरू   अजीजभाई शेख / राहाता  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र शासन जिल्हा शिक्षण व प्रशिक्ष...

 पहिली वर्गाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण सुरू  


अजीजभाई शेख / राहाता 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र शासन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर आणि पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने राहाता येथे इयत्ता पहिली वर्गाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण आज (०९/०६/२०२५) पासून सुरू झाले आहे. 

शैक्षणिक वर्ष २०२५- २६ पासून महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि केंद्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम स्वीकारल्यामुळे पहिलीचा अभ्यासक्रम बदलणे क्रम प्राप्त होते. पहिलीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर हे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यंदा इयत्ता पहिलीपासून नवीन शैक्षणिक धोरणाची सुरुवात टप्प्याटप्प्याने होत आहे. त्यामुळे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून दि. २८ ते ३० मे २०२५ या कालावधीत कोकमठाण येथे पहिल्या इयत्तेचे अभ्यासक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता जिल्ह्यातील तालुकास्तरावरचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. राहाता येथील पहिली वर्गास शिकवणारे १७० शिक्षकांचे प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे व समन्वयक दिलीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली रयत शिक्षण संस्थेच्या शारदा विद्या मंदिर येथे हे प्रशिक्षण दि. ९ ते ११ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार टप्प्याटप्प्याने आयोजित केलेल्या या प्रशिक्षणामध्ये राहाता तालुका अधिनस्त सर्व जिल्हा परिषद खाजगी अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली वर्गात शिकवणाऱ्या सर्व शिक्षकास हे प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आलेले आहे.

वृत्त विशेष सहयोग

डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मिडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments