adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माचला वर्डी फाटाच्या मध्ये आठशे किलो गुरांचे मास जप्त

  माचला वर्डी फाटाच्या मध्ये आठशे किलो गुरांचे मास  जप्त चोपडा प्रतिनिधी रविंद्र कोळी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा- यावल रस्त्यावरील म...

 माचला वर्डी फाटाच्या मध्ये आठशे किलो गुरांचे मास  जप्त


चोपडा प्रतिनिधी रविंद्र कोळी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा- यावल रस्त्यावरील माचला वर्डी फाट्याच्या मध्ये मांस वाहतूक करणारे पिकअप वाहन (एमएच ४३ बीबी ०४०९) पकडले. यामध्ये ८०० किलो गुरांचे मांस आढळून आले आहे. रविवारी दुपारी अडीच वाजता ही कारवाई झाली.


चोपडा येथील गोरक्षक संग्राम परदेशी, आकाश भोई, मनु माळी, रोशन चौधरी, भूषण कोळी, पीयूष पाटील, रोहित पाटील आदींनी पिकअप गाडीचा पाठलाग केला. चालकाने माचला गावच्या शिवारात एका केळीच्या शेतात गाडी उतरून तो चालक फरार झाला. पुढे पोलिसांनी आणि गोरक्षकांनी ती गाडी अडावद पोलिस ठाण्यात जमा केली. गाडीत ८०० किलो एवढे गुरांचे मांस सापडले. सदर गाडी ही चोपडा शहरातून केजीएन कॉलनीतून निघाल्याचे गोरक्षकांनी सांगितले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश कुलदीपकर डॉ सायली गोसावी डॉ पंकज सैंदाणे डॉ रवि कोळी यांनी मांसचे नमुने घेतले. अडावद पोलिसानीं अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला

No comments