शाळांच्या सुरक्षेसाठी परिसरात दामिनी पथकासह इ बीट सिस्टमच्या माध्यमातून लक्ष राहणार -सपोनि विशाल पाटील सावदा पोलीस स्टेशनची मुख्याध्यापका...
शाळांच्या सुरक्षेसाठी परिसरात दामिनी पथकासह इ बीट सिस्टमच्या माध्यमातून लक्ष राहणार -सपोनि विशाल पाटील
सावदा पोलीस स्टेशनची मुख्याध्यापकांसोबत बैठक
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा पोलीस स्टेशन येथे सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि नव्या शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सावदा पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मुख्याध्यापकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. शाळांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. तसेच, शाळेत किंवा परिसरात कोणतीही संशयास्पद माहिती आढळल्यास तात्काळ सावदा पोलीस स्टेशनला कळवण्याचे आदेश देण्यात आले.
सावदा शहरात महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकामार्फत सावदा शहरातील शाळांचा समावेश करण्यात आला असून रोज सर्व शाळांना भेटी देण्याचे नियोजन आहे. शाळेच्या परिसरात दामिनी पथक विशेष लक्ष ठेवणार असून, इ बीट सिस्टमच्या माध्यमातून व्हिजिट होईल. जळगांव जिल्ह्यात मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी पोस्टच्या हद्दीत गस्ती साठी इ बीट प्रणाली सुरू करण्यात आली आहे.तसेच
शाळांच्या सुरक्षेसाठी परिसरात दामिनी पथकासह इ बीट सिस्टमच्या माध्यमातून लक्ष राहणार असल्याचे ही सपोनि विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले
या बैठकीस सपोनि पाटील पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, पोलीस उपनिरीक्षक बशीर तडवी, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील, सहाय्यक फौजदार संजय देवरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश पाटील यांच्यासह सावदा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीमुळे पोलीस आणि शाळा प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सावदा पोलीस स्टेशनने घेतलेल्या या पुढाकाराचे मुख्याध्यापकांनी स्वागत केले आहे. नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस आणि शाळा प्रशासन एकत्रितपणे काम करणार आहे.

No comments