मोफत नेत्र तपासणी शिबिरात १५० लाभार्थ्यांनी घेतला लाभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शिवसेनातर्फे आयोजन किरण च...
मोफत नेत्र तपासणी शिबिरात १५० लाभार्थ्यांनी घेतला लाभ
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेर शिवसेनातर्फे आयोजन
किरण चव्हाण अमळनेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अमळनेर : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिसवानिमित्त ५ रोजी अमळनेर शिवसेनातर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तालुक्यातील सुमारे १५० जणांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटक जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील होते.
तालुक्यातील नेत्ररोगाने त्रस्त नागरिकांची निकड लक्षात घेता शिवसेना तालुका प्रमुख सुरेश पाटील व शहर प्रमुख संजय पाटील यांनी या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सुरेश पाटील यांचे वडील अर्जुन डिगंबर पाटील व आई कमलबाई अर्जुन पाटील यांच्यासह सुमारे १५० गरजूंनी शिबिरात डोळ्यांची तपासणी करुन घेतली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून बसस्थानकाजवळीच शिवसेना कार्यालयात जनतेच्या सेवेसाठी ऑनलाईन सेतू सुविधा केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक विक्रांत पाटील, उप शहर प्रमुख प्रवीण पाटील, वैद्यकीय तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, उप तालुका प्रमुख संतोष पाटील, हेडावे माजी सरपंच रवींद्र पाटील यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शिवसेना कार्यकर्ते भूषण कोळी, अनिल पाटील, पोलिस पाटील विजय पाटील, अमित ललवाणी, शोयब शेख, उमाकांत चव्हाण, रितेश बोरसे याचे सहकार्य लाभले.

No comments