adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इस्लाम धर्माचे चौथे तत्त्व हज इस्लाम हे हजरत इब्राहिम

  इस्लाम धर्माचे चौथे तत्त्व हज इस्लाम हे हजरत इब्राहिम  (अ.) यांनी आणलेल्या सत्यधर्माची खरी आवृत्ती होय व त्यात शेवटचे पैगंबर म्हणजे हजरत म...

 इस्लाम धर्माचे चौथे तत्त्व हज

इस्लाम हे हजरत इब्राहिम (अ.) यांनी आणलेल्या सत्यधर्माची खरी आवृत्ती होय व त्यात शेवटचे पैगंबर म्हणजे हजरत मुहम्मद पैगंबर

(स.). हज हे हजरत इब्राहीम (अ.) च्या धर्माची आठवण आहे. अल्लाहला मानणाऱ्या जगातील सर्व लोकांचे केंद्र व्हावे यासाठी काबा ही पवित्र मशीद हजरत इब्राहीम व हजरत इस्माईल

(अ.) यांनी अल्लाहच्या प्रार्थनेसाठी सर्वप्रथम' बांधली. हेतू हा की, एका ईश्वराला मानणाऱ्या जगातील सर्व लोकांनी वर्षातून एकदा एकत्र येऊन इब्राहीम च्या पद्धतीने अल्लाहाची प्रार्थना

करावी. काबा ही मशीद आहे. जिच्याकडे तोंडकरूनच सर्वजण दिवसातून ५

वेळा नमाज अदा करतात. असे

ठरविण्यात आले की ज्यांच्याजवळ मक्केत जाण्यासाठी पैसे आहेत व

प्रवास सुखरूप करण्याची अंगात शक्ती आहे. त्यांनी आयुष्यात एकदा काबा

या मशिदीत हजर व्हावे व हजरत

इब्राहीम (अ.) प्रमाणेच या मशिदीला चोहोबाजूंस प्रदक्षिणा घालावी.यालाच तवाफ म्हणतात. हजरत

हाजराप्रमाणे सफा व मरवा नावाच्या टेकड्यांच्यामध्ये अत्यंत मनःपूर्वक आपल्या पापक्षालनासाठी अल्लाहची

प्रार्थना करावी व मीनामध्ये जाऊन हजरत इस्लाइल (अ.) प्रमाणे कुर्बानीचा उत्सव साजरा करावा. जगातील सर्व

बांधवांनी एकत्र येऊन धर्माच्या व

विश्वाच्या उन्नतीसाठी व विश्वशांतीसाठी

विचार करावा व जगात वसलेल्या बांधवांच्या उत्कर्षासाठी योजना

आखाव्यात यासाठीच हजचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दरवर्षी जगातील सर्वच देशांतून

करोडो श्रद्धावंत हजला जातात.

आता हजरत मुहम्मद (स.) यांच्या शिवकणुकीमुळे मानवाने समानतेचा धडा गिरवला. मानवांनी निर्मिलेले सर्व

भेदभाव नष्ट झाले. सर्व एका आदमचे वंशज ठरले. अरबमधील सर्व चुकीच्या

रूढी, परंपरा, खोटे कायदे, व्यभिचार व दुराचार हजरत मुहम्मदच्या शिक्षणाने नष्ट

झाले. कुराणने आणलेले व हजरतांनी दिलेले शिक्षण इस्लाम धर्मीयांच्या आयुष्याची तत्त्वे बनली. मुहम्मद पैगंबर

(स.) यांनी नवासमाज, नवीन अनुयायी, नवीन संस्कृती, नवीन कायदे, नवीन राज्य या पृथ्वीवर स्थापन केले.

अब्दुल सरदार पटेल

चोपडा, जि. जळगाव

मो.८७६६७४७०९२

No comments