फैजपूर शहरात अवैध सावकारी मुळे जनता त्रस्त अवैध सावकार यांच्यावर कारवाई करावी; मागणी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजप...
फैजपूर शहरात अवैध सावकारी मुळे जनता त्रस्त
अवैध सावकार यांच्यावर कारवाई करावी; मागणी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर शहरात वाहने,प्लॉट व शेत तसेच रोख रक्कम देऊन अवैध सावकारी करून लोकांच्या जमिनी अल्प दरात नावावर करून सावकार मुळे जनता कमाली ची त्रस्त झाली असून या अवैध रित्या सावकारी करून त्याचा महिन्याकाठी १० % व्याज आकारून व्याज लावून तिची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे तसेच एक महिन्याच्या व्याज न मिळाल्यास दमदाटी शिवीगाळ करून त्यांना
शहरात त्याची गाडी परत न देणे पुन्हा व्याज लागेल अश्या दमदाटी रोजच पहायला मिळत आहे गाडी नावावर न करता त्याचे आर सी बुक स्वतः जवळ ठेवून व १०० रुपयाचा स्टॅम्प पेपर वर सही घेतल्या जात आहे मात्र हा कायद्यात बसत नाही जर सावकार कडून गाडी परत दिली जात नसेल तर पोलीस स्टेशन तक्रार केली पाहिजे
आधीच कमी किमतीत प्लॉट व शेत नावावर करून सरासरी १० टक्के व्याज लावून त्याच्या आर्थिक कंबरडे मोडत आहे. फैजपूर शहरात अवैध सावकारी करून ज्यांनी लोकांच्या गाडी अथवा शेती गहाण ठेवली आहे तसेच ५ ते १० टक्के व्याजाने वसुली करून लोकांना त्रास देत सावकार विरुद्ध तात्काळ फैजपूर पोलीस स्टेशन तक्रार देऊन टाकावी तसेच तक्रारी दाखल न केल्यास वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्यालय जळगांव येथे तक्रार सुध्दा दाखल करू शकतात.
No comments