ज्ञानपूर्णा विद्यालयात विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप व पुष्पगुच्छ देवून प्रवेशोत्सव साजरा किरण धायले मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवा...
ज्ञानपूर्णा विद्यालयात विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप व पुष्पगुच्छ देवून प्रवेशोत्सव साजरा
किरण धायले मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज्ञानदेव अंतुरली संचलित ज्ञानपूर्णा विद्यालय व जुनिअर कॉलेज इच्छापूर निमखेडी येथे विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय पाठ्यक्रम पुस्तकाचे संच वाटप करण्यात आले .याप्रसंगी ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष एस ए भोइसर यांचे शुभ हस्ते वाटप करण्यात आले.प्राचार्य बी.डी.बारी सर ,प्रा. वाडेकर, प्रा.मनोज भोई, मेढे सर, महेंद्र तायडे सर ,मीनल ताई कोल्हे, ,बी.के. महाजन सर, प्रदीप महाजन सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते
No comments