यावल न्यायालयाने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग द...
यावल न्यायालयाने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस. योग दिनाचे भारतासाठी विशेष महत्त्व आहे. सारे जगाला 'आरोग्य धनसंपदा' चा संदेश देत योगाचे शारीरिक मानसिक तसेच अध्यात्मिक आरोग्यासाठी चे महत्व पटवून दिले. त्यामुळे जगानेही 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून स्वीकारला.
या अनुषंगाने आज यावल न्यायालयात येथील प्रथम वर्ग न्यायाधीश श्री.आर.एस. जगताप यांच्या आदेशानुसार तसेच सह दिवाणी न्यायाधीश श्री. जी.आर. कोलते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.एम. झांबरे यांनी केले. सहदिवाणी न्यायाधीश श्री.जी.आर.कोलते साहेब यांनी स्वतः योग शिक्षक म्हणून भूमिका पार पाडली. त्यांनी योगाचे महत्त्व सांगून, विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितीत सर्वांकडून योगासने करवून घेतली. "योगामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. आपली एकाग्रता वाढते.कार्यशैलीमध्ये निपुणता येते". असे सांगून त्यांनी योगाला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवा असे आवाहन ही केले.
यावेळी वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. श्री.एस.जी. कवडीवाले, ॲड. एन.एम चौधरी, ॲड. अशोक सुरळकर, ॲड. गोविंदा बारी, ॲड. धीरज चौधरी, ॲड. रितेश बारी, समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारूळकर, अजय बढे तसेच यावेळी लघुलेखक आर .एस.बडगुजर, डी.जे.पाटील, ए.बी.पाटील, ए.बी.पोफळे, आर.ए.अहिरे, आर.एन.चव्हाण, बी के.माळी, एस.डी.आवारे आदी न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ लिपिक संजीव तडवी यांनी परिश्रम घेतले.

No comments