adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भालोद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न

  भालोद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न  शब्बीर खान यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज...

 भालोद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न 


शब्बीर खान यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व योगा व ध्यान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.किशोर कोल्हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.दिनेश महाजन यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व योगा व ध्यान केंद्राचे समन्वयक प्रा.डॉ.मुकेश पवार यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवकांना विविध प्रकारच्या योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले आणि उपस्थितांकडून ती करवून घेतली. तसेच प्रत्येक योगासनाबद्दल माहिती दिली. तसेच नियमित योगासने केल्याने मानसिक व शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहते, मनाची एकाग्रता वाढते व स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते. योगासन व प्राणायाम करण्याचे फायदे त्यांनी आपल्या योगासनांचे प्रात्यक्षिक करताना सांगितले. 


  आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.कोल्हे यांनी, योगासनांचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते. म्हणून योगा केवळ एक दिवस करायचा नसून तो संपूर्ण वर्षभर करायला हवा. तसे जर केले तर आपल्याला मन:शांती, शारीरिक आणि मानसिक लाभ होतो. योगाने आपल्या संपूर्ण शरीराचा खऱ्या अर्थाने व्यायाम होतो व शरीर निरोगी राहते असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.के. एस.पाटील यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनाच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.मोहिनी तायडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments