adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोरपावली जि.प.शाळेत प्रवेश घ्या तुमची घरपट्टी पाणीपट्टी माफ. अनोखा उपक्रमाचा संपूर्ण यावल तालुक्यात चर्चेला उधाण: सरपंच विलास अडकमोल.

कोरपावली जि.प.शाळेत प्रवेश घ्या तुमची घरपट्टी पाणीपट्टी माफ. अनोखा उपक्रमाचा संपूर्ण यावल तालुक्यात चर्चेला उधाण: सरपंच विलास अडकमोल. भरत को...

कोरपावली जि.प.शाळेत प्रवेश घ्या तुमची घरपट्टी पाणीपट्टी माफ.

अनोखा उपक्रमाचा संपूर्ण यावल तालुक्यात चर्चेला उधाण: सरपंच विलास अडकमोल.

भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

संपूर्ण देशात खाजगी शाळांनी, त्यांच्या फी ने पालकांचे डोके दुःखी वाढवली असून, या मुळे जि.प. शाळांना टाळे ठोकण्याची वेळ आली असून, महागाईच्या काळात सरपंच विलास अडकमोल यांच्या अध्यक्षते खाली आणि सूचक आरिफ कलंदर तडवी यांच्या सुचणे नुसार यावल तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायत वतीने एक अनोखा उपक्रम गावात राबविण्यात येत आहे, तो असा कि जिल्हा परिषद शाळा कोरपावली मध्ये इयत्ता १ ली वर्गात जे मुलं किव्वा मुली प्रवेश घेतील त्यांच्या कुटुंबियांना चालू वर्ष २०२५/२६ मध्ये घरपट्टी व पाणीपट्टी या वरती लागणारे सर्व कर माफ करण्यात येणार आहेत, सदर निर्णय आज दिनांक ९/०६/२०२५ रोजी सरपंच यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आला असून असा मासिक सभेमध्ये सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला आहे तर या निर्णयास सौ.हफशान जुम्मा यांनी अनुमोदन दिलें आहे.

     संपूर्ण यावल तालुक्यात चर्चेला उधाण
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात खाजगी शिक्षणामुळे पालकांचे डोके दुःखी वाढली असून या खाजगी शिक्षणामुळे अनेक जि.प.शाळांना कुलूप ठोकण्यात आले आहे, अनेक शाळा बंद पडल्या असून, या महागाईच्या काळात कोरपावली ग्रामपंचायत ने घेतलेला हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे या कारणाने संपूर्ण यावल तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे,सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments