रावेरच्या पाल जंगलातून दोन गावठी कट्ट्यांसह मध्यप्रदेशच्या दोघांना अटक पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संप...
रावेरच्या पाल जंगलातून दोन गावठी कट्ट्यांसह मध्यप्रदेशच्या दोघांना अटक पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मध्यप्रदेशातील इसम गावठी कट्टे विक्रीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर तालुक्यातील पाल परिसरातील जंगलातून मध्यप्रदेशातील दोन तरुणांना ताब्यात घेतले. व अंगझडतीत त्यांच्या ताब्यातील दोन बेकायदा गावठी कट्टे, दोन मोटार सायकली व दोन मोबाईल असा एकूण एक लाख सत्तर हजाराचा मुद्देमाल हस्तगत करुन जप्त करण्यात आला आहे. व गोविंदसिंग ठानसिंग बर्नाला व निमानसिंग जिवनसिंग बर्नाला या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे
८ जून रोजी दोघे तरुण गावठी कट्टे विक्रीसाठी मध्य प्रदेशातून रावेर तालुक्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार रवी नरवाडे आणि हे कॉ गोपाल गव्हाळे या दोघांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शरद बागल, स फौ रवी नरवाडे, हे कॉ गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ नितीन बाविस्कर, पो कॉ बबन पाटील, पो.हे.कॉ. दिपक चौधरी आदींच्या पथकाने या तपास कामगिरीत सहभाग घेऊन पाल येथील दुर्गम भागात दोघांचा पाठलाग करून दोघांना दोन गावठी कट्ट्यांसह ताब्यात घेतले.
या दोघांविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक तुषार पाटील करत आहेत

No comments