एमआयडीसी पोलीस ऍक्शन मोडमध्ये,गोवंशीय जनावरांचा कत्तलखाना उद्ध्वस्त,लाखोंचा मुद्देमाल जप्त सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायक...
एमआयडीसी पोलीस ऍक्शन मोडमध्ये,गोवंशीय जनावरांचा कत्तलखाना उद्ध्वस्त,लाखोंचा मुद्देमाल जप्त
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि८):- गोवंशीय जनावरांची कत्तल करणा-यांवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकत ४ लाख ७०,०००/- रु.किंमतीचा मुददेमाल जप्त करून ०२ आरोपी जेरबंद करण्याची कारवाई केली आहे.बातमीची हकीकत अशी की,दि.०८/०६/२०२५ रोजी सकाळी १०/३० वा.चे सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.माणिक चौधरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्याच्या हददीतील जेऊर बायजाबाई गावातील मुनाफ चाँद शेख आणि मुजफर चाँद शेख यांच्या राहते घराचे पाठीमागील गोठ्यात कत्तल केलेले गोवंशीय मांस तसेच कत्तल करण्याच्या उददेशाने गोवंशीय जनावरे निर्दयतेने डांबून ठेवलेबाबत मिळालेल्या माहितीवरुन एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने नमूद ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला असता सलमान अजीज शेख,वय २५ वर्षे, रा. घासगल्ली, कोठला, ता.जि.अहिल्यानगर यास ताब्यात घेतले.सलमान अजीज शेख याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदारांची नावे १)इकलास शेख २)मुनाफ चाँद शेख ३) मुजफर चाँद शेख ४)अस्लम खलील कुरेशी अशी सांगितली. नमूद घटनास्थळावरुन ५००/- किलो गोवंशीय मांस,पाच गोवंशीय जातीची जनावरे, वापरण्यात आलेल्या गाड्या तसेच कत्तलीसाठी लागणारे साहित्य असा एकुण ४,७०,०००/- रु.किं.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.याबाबत एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई एम.आय.डी.सी. पोस्टे करत आहेत.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामिण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.माणिक चौधरी,पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी, पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस उपनिरीक्षक देविदास भालेराव,पोलीस उपनिरीक्षक अनिल आढाव,सफौ.बाबासाहेब काळे,सफौ.राकेश खेडकर, पोहेकॉ.रमेश थोरवे,पोहेकॉ.राजु सुद्रिक,पोकॉ भगवान वंजारी, पोकॉ.सुरेश सानप,पोकॉ.ज्ञानेश्वर तांदळे,पोकॉ.अक्षय रोहोकले, चापोकॉ.पवार यांनी केली आहे.

No comments