शासकीय विश्रामगृह परिसरात सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी कोण पूढाकार घेणार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केव्हा जाग येणार,, ...
शासकीय विश्रामगृह परिसरात सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी कोण पूढाकार घेणार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केव्हा जाग येणार,,
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासनाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात असलेल्या व येणाऱ्या वरीष्ठ साधारण गेस्ट हाऊसमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एकवा फिल्टर मशीन बसवले गेले आहेत मात्र नाशिक हा जिल्हा असतानाच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नेहमी वर्दळ असते लोकप्रतिनिधी मंत्री साहेब पोलिस प्रशासन यांचे वरीष्ठ अधिकारी वर्ग सतत कार्यरत असताना देखील त्यांना सतत पिण्याच्या पाण्यासाठी उपहारगृहात पाण्याची बिसलेरी नाईलाजाने घ्यावी लागते लाखो करोडो रुपये शासकीय विश्रामगृह इमारत देखभाल दुरुस्ती करणं विशेष दूरूस्ती करण्यासाठी खर्च केला जातो मात्र आवश्यकता असणाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणी पूढाकार घेतला नाही आणि घेतांना दिसत नाही यास जबाबदार कोण याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही या शासकीय विश्रामगृहाची देखभाल करणारे अधिकारी वर्ग काय करतात त्यांना हा विषय अत्यंत आवश्यक असताना मात्र उघड्या डोळ्यांनी कसा दिसत नाही हे मात्र विशेषच म्हणावं लागेल यांत साशंकता निर्माण झाली आहे अधिकारी वर्ग यांना कोणत्याही व्यक्तीला पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे का नाही याचं काही देवाणघेवाण लागत नाही वाटत ही वस्तुस्थिती आहे यात शंका नाही सांबा खात्याचे अधिकारी कितपत लक्ष वेधून किती इमानेइतबारे कामं करत आहेत याबाबत स्वतःहा साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्र यांनी प्रसिद्धीच्या माध्यमातून योग्य तो पाठपुरावा केला असता शिर्डी संगमनेर आदी भागात तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यांचा पाठपुरावा केला अधिकारी वर्ग यांना याकडे लक्ष वेधण्यासाठी बातम्या प्रसिद्ध करण्यात आली आता त्याच यूक्ती प्रमाणे नाशिक येथील शासकीय विश्रामगृहात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्र प्रसिद्धीच्या माध्यमातून योग्य तो पाठपुरावा करत आहे सविस्तर माहिती पुढील अंकात वाचा

No comments