Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

विद्युतवाहक तारा व नवीन बांधलेल्या पुलावर विद्युत अपघात होण्याची शक्यता? महावितरण ची सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस

  विद्युतवाहक तारा व नवीन बांधलेल्या पुलावर विद्युत अपघात होण्याची शक्यता?   महावितरण ची सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस    रावेर प्रतिनिधी...

 विद्युतवाहक तारा व नवीन बांधलेल्या पुलावर विद्युत अपघात होण्याची शक्यता?

 महावितरण ची सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस  


 रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 रावेर तालुक्यातील मोठा बुद्रुक येथे 25 15 निधी अंतर्गत नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आलेले आहे पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले असून दरम्यानच्या रस्त्यावरील जागेत महावितरण कंपनीच्या  विद्युत वीज वाहक तारा आणि नवीन बांधलेला पूल वरील रस्ता या दोघांच्या मधील अंतर खूप कमी झाले असून रहदारी दरम्यान एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे पुलावरून रहदारी सुरू होण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांनी आवश्यक ती खबरदारी व उपायोजना करणे कामी सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा यांना पत्राद्वारे जाणीव करून दिली आहे 

 महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता सावदा यांच्या नावाने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की  मौजे वाघोदा बु॥ येथील बसस्टैंड ते ग्रामपंचायत दरम्यान पुलाचे काम चालू असते वेळी भरावामुळे विद्युत तार आणि रस्त्यामधील अंतर कमी होऊन संभाव्य अपघात किंवा अप्रिय घटना घडू नये याकरिता उपरोक्त विषयास अनुसरून आपल्या मौजे वाघोदा बु॥ कार्यक्षेत्रात बस स्टॅन्ड ते ग्रामपंचायत या रस्त्यावर असलेल्या नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम  होऊन नवीन पूल बनवला जात असून सदरील कामांमध्ये त्या पुला ची उंची वाढली असून सदरील कामामुळे रस्ता व तारांमधील अंतर कमी होऊन तेथे भीषण वीज विद्युत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही? तरी तत्पूर्वी  आपण ते काम कोणत्या कर्यालया मार्फत होत आहे त्यांना कळवावे व त्या कार्यालयास कळवून ते काम त्वरित थांबवून आधी विद्युत तार इतर ठिकाणी नियमानुसार हलवून किंवा उंची वाढवून योग्य ते काम योग्य ठेकेदार मार्फत करून नियमानुसार करून मगच काम पुढे न्यावे ही विनंती अन्यथा काही अपघात झाल्यास महावितरण कंपनी जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. असे पत्र महावितरण कनिष्ठ अभियंता श्री प्रसन्न साळुंखे यांच्या सहीचे पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग शाखा अभियंता सावदा यांना  देण्यात आले आहे.

No comments