Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किनगाव ग्रामीण रुग्णालय तत्काळ सुरु करण्यासाठी मनसेची मागणी

  किनगाव ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करण्यासाठी मनसेची मागणी   भरत कोळी यावल ता प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्यातील क...

 किनगाव ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करण्यासाठी मनसेची मागणी


 भरत कोळी यावल ता प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उभारण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय 2022-2023 मध्ये पूर्ण झाले असले तरी अद्यापही ते सुरु करण्यात आलेले नाही. परिणामी, परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रावेर लोकसभेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांना निवेदन देऊन ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरु करण्याची मागणी करण्यात आली. या रुग्णालयाचा लाभ किनगाव बु., किनगाव खु., नायगाव, डांभूर्णी, कोळन्हावी, चिंचोली, आडगाव, कासारखेडा, मालोद, इचखेडा, खालकोट, वाघझिरा, निमछाव, लसूणबर्डी, गायरान, चूचाळे, गिरडगाव व वाघोदा या 15-20 गावांतील हजारो नागरिकांना होणार आहे.

अश्या आहे मागण्या 

किनगाव ग्रामीण रुग्णालय त्वरित सुरु करावे, डॉक्टर, नर्सेस, औषधसाठा, वीज-पाणी-सफाई यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,

रुग्णवाहिका सेवा नियमित सुरू ठेवावी,

 योजनांचा लाभ स्थानिक लोकांना मिळेल याची खात्री द्यावी,आरोग्यसेवा नसल्यामुळे अनेकदा रुग्णांना 30-40 किमी अंतरावरील जळगाव गाठावे लागते, त्यामुळे गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. विशेषतः अपघात, सर्पदंश, गरोदर महिलांचे प्रसंग, लहान अपघाती दुखापती या वेळेस तातडीची सेवा मिळणे आवश्यक असते.

हे निवेदन वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अक्षय तोडेकर यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, मनविसे जळगावं जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, मनसे जळगावं उपशहराध्यक्ष ललित शर्मा, यावल मनविसे तालुका उपाध्यक्ष उदय पाटील, तसेच प्रतीक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे व ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य हक्कासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments