adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हाणपूर - अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण संदर्भात प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे घेतली फैजपूर येथे बैठक संपन्न

  राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हाणपूर - अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण संदर्भात प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यसाठी केंद्रीय राज...

 राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हाणपूर - अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण संदर्भात प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे घेतली फैजपूर येथे बैठक संपन्न 


फैजपूर प्रतिनिधी

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

बुऱ्हानपूर - अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच७५३बी तळोदा जंक्शन जवळ सुरु होणारा *तळोदा - शिरपूर - चोपडा - यावल - फैजपूर - सावदा - रावेर  या मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या २४० किमी महामार्गाच्या चौपदरीकरण मंजूर झालेले


 असून याबाबत जमीन संपादन व इतर प्रक्रिया प्रगतीपथावर असून,सदर महामार्गाच्या चौपदरीकरण बाबतीत भूसंपादन होत असलेले शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या अनेक समस्या येत असल्याने आज फैजपूर (यावल) येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,आमदार अमोल हरिभाऊ जावळे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन संबंधितांच्या सर्व समस्या व मागण्या जाणून घेतल्या व याबाबत लवकरच योग्यती कार्यवाही करून पाठपुरावा करणे बाबत आश्वासन दिले.यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,आमदार अमोल हरिभाऊ जावळे,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व स्थानिक सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चोपडा, यावल व रावेर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

No comments