कोतवाली पोलिसांचा झेंडीगेट येथील कत्तलखान्यावर छापा सचिन मोकळं अहिल्यानगर :- (संपादक -:-हेमकांत गायकवाड) झेंडीगेट येथील कत्तलखान्यावर कोत...
कोतवाली पोलिसांचा झेंडीगेट येथील कत्तलखान्यावर छापा
सचिन मोकळं अहिल्यानगर :-
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
झेंडीगेट येथील कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकत 70 हजार रुपये किमतीचे 350 किलो गोमास जप्त केले आहे.वसीम बशीर शेख ( घास गल्ली कोठला) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वसीम शेख याच्याविरुद्ध प्राणी रक्षा अधी,तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागावण्यास प्रतिबंध अधि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास महिला पोलीस अंमलदार रोहिणी दरंदले करीत आहे. सदरची कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार ए.पी.इनामदार, सचिन लोळगे,दीपक रोहकले,तानाजी पवार,दत्तात्रय कोतकर,प्रतिभा नागरे,रोहिणी दरंदले,सुरज कदम यांनी केली आहे.

No comments