लासूर येथिल नामदेव साळुंखे सर यांच्या सेवापुर्ती समारंभ संपन्न लासूर ता.चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील लास...
लासूर येथिल नामदेव साळुंखे सर यांच्या सेवापुर्ती समारंभ संपन्न
लासूर ता.चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील लासुर येथिल रहिवाशी नामदेव सुकलाल साळुंखे हे आपल्या 35 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवा निवृत्त झाले या निमित्ताने त्यांचा सेवापुर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्यान पंडीत बापूसाहेब ग.द.माळी.गुरुजी शिक्षण प्रसारक संस्था धुळे संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय कळमसरे चे अध्यक्ष मोहन दयाराम सोनवणे हे होते यावेळी हर्षाली महाजन,पी.जी.महाजन,एस.एस.जाधव, राजेंद्र उत्तम पाटील,ए.के.गंभीर सर, प्रल्हाद सोनार, संगिता देवरे,देविलाल बाविस्कर, तसेच अध्यक्षीय मनोगत संस्थेचे अध्यक्ष मोहन दयाराम सोनवणे यांनी केले या मनोगतातून वक्त्यांनी नामदेव साळुंखे सर यांच्या सेवा काळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल बद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या, नामदेव साळुंखे यांनी आपल्या मनोगतात सांगितले मला सेवा काळात संस्थेचे संचालक मंडळ तसेच स्टाफ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त विद्यार्थी कला स्पर्धेत भाग घेवून पास होतील व विद्यालयाचे नाव अग्रस्थानी राहण्यासाठी मी प्रयत्न केले यावेळी शरद दयाराम सोनवणे, गौरव मोहन सोनवणे ,ए.के.गंभीर सर राजेंद्र पाटील, डॉ .साळूंखे,पी.जी.महाजन ,माजी नगराध्यक्ष संगिता देवरे, सुहासिनी सोनवणे, वैशाली सोनवणे,मनीषा महाजन,एस एस जाधव,वाय.ए.पाटील,लासूरचे माजी सरपंच देविलाल बाविस्कर,ह.भ.प.बापू महाराज, पत्रकार दिलीप पालीवाल मधूकर बडगुजर,डी.टी.चव्हाण एस टी.चव्हाण,आर.जे.सोनवणे निश्चल महाजन तसेच संस्थेचे संचालक मंडळ व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्र परीवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण माळी सरांनी केले तर आभार प्रदर्शन माळी भुषण साप्ताहिकाचे संपादक भिमराव महाजन यांनी केले.
No comments