आरोग्याची वारी पंढरिच्या दारी जळगाव प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) महंत.प्रा.ह.भ.प.डॉ.सुशिलजी महाराज युवा मंच खान्देश व गोदावरी फाउंडे...
आरोग्याची वारी पंढरिच्या दारी
जळगाव प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
महंत.प्रा.ह.भ.प.डॉ.सुशिलजी महाराज युवा मंच खान्देश व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने खान्देशातुन पंढरपूर पायी जानाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे, या शिबिराचे उद्घाटन दि.16 जून 2025 सकाळी 8.30 वा. प.पु.प्रसाद महाराज अमळनेरकर, यांच्या शुभहस्ते नगरदेवळा येथे होणार असून
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार मा.किशोर आप्पा पाटील, डॉ. केतकीताई पाटील,मा.भैय्यासाहेब पाटील, महंत प्रा. डॉ. सुशिल महाराज हे राहणार असून,डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर्स टीम तपासणी करीता उपस्थित राहणार आहे,या शिबिरात हृदयरोग,जनरल मेडिसिन,अस्थिरोग,मानसोपचार, मोफत एन्जोप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया, प्रोस्टेट,कर्करोग विभाग व फीजीओथेरपी या संदर्भाच्या आरोग्याच्या मोफत तपासण्या करण्यात येणार असून, वारकऱ्यांनी या तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन महंत प्रा.डॉ. सुशील महाराज युवा मंच खान्देश यांच्या वतीने करण्यात येत आहे


No comments