adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाई शहरांत गहाळ झालेले 6 लाखांचे 30 मोबाईल शोधून नागरिकांना परत..! वाई पोलीस नेहमीच प्रयत्नशील,

  वाई शहरांत गहाळ झालेले 6 लाखांचे 30 मोबाईल शोधून नागरिकांना परत..! वाई पोलीस नेहमीच प्रयत्नशील संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनि...

 वाई शहरांत गहाळ झालेले 6 लाखांचे 30 मोबाईल शोधून नागरिकांना परत..! वाई पोलीस नेहमीच प्रयत्नशील


संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 वाई पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये नागरिकांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले असून वाई पोलिसही सर्वसामान्यांसाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत. त्या अनुषंगाने वाई पोलिसांनी तपास करीत जवळपास 6 लाख रुपये किंमतीचे 30 मोबाईल मूळ मालकांना परत केले आहेत. वाई शहरांची बाजारपेठ सातारा जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्यामुळे वाई शहरांची एक दर्जात्मक ओळख आहे वाई शहरांत आजूबाजूच्या गावांचे इतर तालुक्यांतून हजारों संख्येने नागरिक नोकरी रोजगार व शिक्षणासाठी येतात त्यावेळी प्रवासात बाजारपेठेत व इतर ठिकाणी मोबाईल घाट होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्या अनुषंगाने वाई पोलिस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करीत महाराष्ट्र राज्यांच्या विविध भागांतून तसेच इतर राज्यांतून मोबाईल परत मिळवत दमदार कामगिरी केली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कुडकर मॅडम उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिंम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे तपासी पथकांचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळूंज पो.कॉ. विशाल शिंदे राम कोळी हेमंत शिंदे श्रावण राठोड महेश पवार (सायबर) यांच्या पथकांने ही कारवाई केली आहे. वाई पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments