adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वा.सै.श्री. शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

  स्वा.सै.श्री. शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस  उत्साहात साजरा  प्रतिनिधी रविंद्र कोळी  (संपादक -:- हेमकांत...

 स्वा.सै.श्री. शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस  उत्साहात साजरा 


प्रतिनिधी रविंद्र कोळी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनानुसार क्रिडा शिक्षक श्री.पी. जी. पाटील सर यांनी विविध योग साधना प्रात्यक्षिक सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी योगा प्रार्थनेने केली. यानंतर क्रीडाशिक्षक श्री.पी जी पाटील यांनी सुरुवातीला पूरक हालचाली करून घेतल्या व त्यानंतर ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, भुजंगासन, पवन मुक्तासन, त्रिकोणासन, शशांकसन, वक्रासन, वज्रासन, मकरासन, अर्ध हलासन व शवासन इत्यादी योगासनाची प्रात्यक्षिके योगा  सादर केली. त्याप्रमाणे उपस्थित विद्यार्थी व शिक्षक बंधूंनी योगा व प्राणायामचा आनंद घेतला .योगा प्रात्यक्षिकात 511 विद्यार्थी, 23 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू व दहा पालक बंधूंनी सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहन चव्हाण सर यांनी विविध योगासने यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले. तसेच अनुलोम विलोम प्राणायाम, कपालभाती उज्जयी प्राणायाम ,भ्रामरी प्राणायाम, ध्यान, याचे प्रात्यक्षिक सादर केले. व शांतीपाठ म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी प्रयत्न केले.

No comments