यावल येथील व्यास मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवा...
यावल येथील व्यास मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील व्यास मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या दिपाली धांडे मॅडम व प्राचार्य रंजना महाजन मॅडम यांनी योगा दिवस निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सरोज येवले मॅडम यांनी केले. योगा दिनानिमित्त शाळेमध्ये शिक्षिका अर्चना पाटील व प्राजक्ता वाणी मॅडम यांनी प्राणायाम व विविध योगासनांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले या प्रशिक्षणासाठी पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे मॅडम व गौरी भिरुड मॅडम यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ताडासन ,भद्रासन, वृक्षासन, त्रिकोणासन ,उष्ट्रासन, अर्धचंद्रासन, मंडूकासन, व विविध प्रकारचे प्राणायाम करून योग दिवसाचा आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले अशाप्रकारे योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments