adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अग्निशमन अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने बजावली नोटीस

  अग्निशमन अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने बजावली नोटीस मालेगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मालेगाव महापाल...

 अग्निशमन अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

आयुक्तांच्या स्वाक्षरीने बजावली नोटीस

मालेगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मालेगाव महापालिकेचे सहायक आयुक्त तथा प्रथम अपिलीय अधिकारी तौसीफ शेख यांच्यासमोर सुरू असलेल्या सुनावणीत माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास बच्छाव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत धमकी दिल्याने अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांना आयुक्त रवींद्र जाधव यांनी निलंबीत का करू नये, या आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते रामदास बच्छाव यांना अधीक्षक पवार शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. माहिती अधिकार संघटनेने कारवाईची मागणी करत असंख्य मेल मनपा प्रशासनास पाठविले. यात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी (दि. १६) आयुक्त जाधव शाळा प्रवेशोत्सव आटोपून कार्यालयात येताच त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. घडलेल्या प्रकारासंदर्भात सहायक आयुक्त शेख यांनी आयुक्तांना अहवाल सादर केला होता. बच्छाव यांनी मनपा अग्निशमन विभागाचे प्रमुख पवार यांच्याकडे १५ एप्रिल २०२५ या दिवसाचे हालचाल रजिस्टर माहिती अधिकारात मागितले होते. यासंदर्भात अग्निशमन विभागाने बच्छाव यांना माहिती न देता २८ रुपयांचे चलन भरण्याचे पत्र दिले. चलन भरल्यानंतर त्यांना माहिती निरंक असल्याबाबत सांगण्यात आले. त्यावर बच्छाव यांनी सहायक आयुक्त शेख यांच्याकडे अपिल दाखल केले होते. याबाबत गुरुवारी (दि.१२) सुनावणी प्रसंगी माहिती जर निरंक दिली, तर २८ रुपयांचे शुल्क का घेतले ? असा प्रश्न केला. त्यावरून बच्छाव याने आरेतुरे केल्याचा आरोप करत पवार यांनी सहायक आयुक्तांसमोरच बच्छाव यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती.

No comments