मनसेच्या जळगाव शहर उपमहानगर अध्यक्ष पदी राजेंद्र निकम व प्रकाश जोशी यांची नियुक्ती. जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनसे नेते...
मनसेच्या जळगाव शहर उपमहानगर अध्यक्ष पदी राजेंद्र निकम व प्रकाश जोशी यांची नियुक्ती.
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनसे नेते माजी आमदार ॲड जयप्रकाश बाविस्कर साहेब तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष ॲड जमील देशपांडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. जळगाव शहर उप महानगर अध्यक्षपदी राजेंद्र निकम, प्रकाश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच जळगाव सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी सतीश सैंदाणे यांची नियुक्ती करण्यात आली.
नियुक्ती करतेवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर साहेब, जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, महानगराध्यक्ष किरण तळेले, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, चेतन पवार, शहर सचिव जितेंद्र पाटील, ॲड. सागर शिंपी, ऐश्वर्य श्रीरामे, संदीप मांडोळे, गणेश नेरकर, विकास पाथरे, दीपक राठोड, राजू बाविस्कर, महिला सेना अनिताताई कापुरे, लक्ष्मीताई भील, तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
No comments