चोपडा येथे किमान आधारभूत खरेदी योजने अंतर्गत ज्वारी खरेदीला सुरुवात चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक २८ जून २...
चोपडा येथे किमान आधारभूत खरेदी योजने अंतर्गत ज्वारी खरेदीला सुरुवात
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक २८ जून २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजता शासकीय गोदाम मोजे चहार्डी येथे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते व पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित दादा निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत किमान आधारभूत खरेदी योजने अंतर्गत ज्वारी खरेदीला सुरुवात करण्यात आली.
सदर प्रसंगी भाऊसाहेब थोरात तहसीलदार चोपडा,मधुकर साळवे पोलीस निरीक्षक चोपडा,किरण मेश्राम पुरवठा तपासणी अधिकारी,योगेश नन्नवरे गोदाम व्यवस्थापक,मेघना गरुड पुरवठा निरीक्षक,प्रकाश रजाळे,रावसाहेब पाटील,दीपक बिऱ्हाडे,बंडू चौधरी,किरण पाटील,जगदीश पाटील उपस्थित होते.
तालुका शेतकी संघ कार्यालयामध्ये एकूण २८६ शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेली असून त्या अंतर्गत सहा हजार १०० क्विंटल एवढे ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे सदरील कार्यक्रमावेळी चोपडा तालुक्यामधील शेतकरी वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.
No comments