जळगांव येथे “केळी परिषद २०२५” संपन्न केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थिती जळगाव....(अनिलकुमार पालीवाल यांजकडून) (संपादक ...
जळगांव येथे “केळी परिषद २०२५” संपन्न
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थिती
जळगाव....(अनिलकुमार पालीवाल यांजकडून)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मॅक्स किसान, जैन इरिगेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे “केळी परिषद २०२५” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता, कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित केळी उत्पादक व केळी तज्ञ यांच्याशी संवाद साधला.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जैन इरिगेशनचे चेअरमन श्री.अशोक जैन, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद आमदार श्री. अमोल हरिभाऊ जावळे, अखिल भारतीय केळी उत्पादन संघ अध्यक्ष श्री.भागवत पाटील, भारतीय बनाना ग्रोथ सचिव श्री.वसंत महाजन, मॅक्स महाराष्ट्र संपादक श्री. रवी आंबेकर, केळी तज्ञ जैन इरिगेशन डॉ.के.बी.पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक श्री.कुरबान तडवी, मॅक्स किसान संपादक श्री. संतोष सोनवणे ई. प्रमुख उपस्थितीत होते.


No comments