adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पत्रकार तोडकर यांचेवर नारायणगांव मध्ये हल्ला पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्याची इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अतुल परदेशी यांची मागणी

  पत्रकार तोडकर यांचेवर नारायणगांव मध्ये हल्ला पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्याची इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाचे प्रदेशाध्यक्ष ड...

 पत्रकार तोडकर यांचेवर नारायणगांव मध्ये हल्ला

पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्याची इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अतुल परदेशी यांची मागणी


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वार्तांकनासाठी गेलेले न्यूज 18 लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर नारायणगांव (ता.जुन्रर,जि.पुणे) येथे सोमवार दि.२ जुन रोजी भरदिवसा हल्ला करण्यात आला. त्यांच्या मोटारीचीही नासधूसही केली गेली. 

या घटनेचा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाने लगेच तीव्र निषेध केला तसेच याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्याची लेखी मागणी संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अतुल परदेशी यांनी स्थानिक नारायणगांव पोलिस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षकांना भेटून आज (मंगळवार दि.३) केली. अन्यथा पत्रकारांच्या वतीने राज्यभरात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.


नारायणगांव येथे बांधकाम कामगार नोंदणीसाठी अनधिकृतरित्या भरविण्यात आलेल्या बायोमेट्रिक कॅम्प ची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या तोडकर यांच्याावर नोंदणी करणाऱ्या खासगी एजंटांनी सोमवारी ( दि.२) दुपारी हल्ला केला.अरेरावी करीत त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या मोटारीची काचही फोडली. याबाबत नारायणगांव पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. परंतू,पोलिसांनी एफआयआऱ घेतला नाही. आपल्या गैरकामाचे पितळ उघडे पडू नये याकरिता संघटनेच्या काही लोकांनी हा हल्ला प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या तोडकरांना रोखण्यासाठी  केल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.परदेशी यांनी सांगितले. तसेच हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी तोडकरांविरुद्धच महिलांना धक्काबुक्की केली आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या सुरु असलेल्या हालचालीबद्दल हा प्रकार म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे असा आहे,असा संताप त्यांनी व्यक्त केला. त्याामुळे तोडकर यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस विश्वास आरोटे राज्यातील सर्वच पत्रकार बांधव पत्रकार सचिन तोडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असेही परदेशी यांनी निवेदन देताना आपल्या मनोगत सांगितले. यासंदर्भात सबंधित हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मिडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments