स्थितप्रज्ञतेची उंच भरारी : पायलट सुमित सभरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली (संपादकीय) मृत्यूला कवटाळताना ज्याने स्थितप...
स्थितप्रज्ञतेची उंच भरारी : पायलट सुमित सभरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली
(संपादकीय)
मृत्यूला कवटाळताना ज्याने स्थितप्रज्ञता दाखवली, अशा स्वर्गीय पायलट सुमित सभरवाल यांचं स्मरण करताना मन अभिमान आणि व्याकुळतेने भरून येतं. अहमदाबादजवळ नुकत्याच झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात, जेव्हा काही सेकंदांतच सर्व काही संपण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती तेव्हा पायलट सुमित सभरवाल यांनी केवळ ४० सेकंदांत घेतलेला निर्णय हजारो लोकांचे प्राण वाचवणारा ठरला. विमान ३०४ किमी प्रतितास वेगाने जमिनीकडे झेपावत असताना, त्यांनी हडबडून, घाबरून काहीही निर्णय न घेता, आजूबाजूची वस्तुस्थिती पाहून एका कमी लोकवस्तीच्या भागात विमान वळवले.
पायलटचं कर्तव्य आणि लँडिंगचे नियम काय असतात? प्रत्येक व्यावसायिक विमान पायलटला (Commercial Pilot) डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एविएशन (DGCA) च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागते.
विमानाच्या उड्डाणापासून ते सुरक्षित लँडिंगपर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पायलटवर असतात:
1. Pre-flight Check: उड्डाणाआधी विमानाची यांत्रिक व तांत्रिक तपासणी.
2. Communication: एटीसी (Air Traffic Control) सोबत सातत्याने संपर्क.
3. Flight Path Follow: ठरलेल्या मार्गावरून उड्डाण करत सुरक्षित अंतर राखणे.
4. Emergency Management: अचानक आलेल्या संकटात परिस्थितीचं विश्लेषण करत त्वरित आणि अचूक निर्णय घेणे.
5. Safe Landing: योग्य रनवे निवडून वाऱ्याच्या वेगाचा, उंचीचा आणि इंधनाचा विचार करत योग्य वेग आणि अँगलने विमान जमिनीवर उतरवणे.
लँडिंग दरम्यान काय धोके असतात?
•इंजिन फेल्युअर •खराब हवामान •रनवेवर अडथळा •नियंत्रण यंत्रणेत बिघाड •मानव निर्मित चुका
या सर्व प्रसंगी, पायलटला दडपणाखालीही शांत व समतोल मनाने निर्णय घ्यावा लागतो.
स्थितप्रज्ञतेचा खरा अर्थ
‘स्थितप्रज्ञ’ म्हणजे सुख-दु:ख, यश-अपयश, संकट संधी या सगळ्यांमध्येही ज्याचं मन स्थिर राहतं. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हेच शिकवतात की युद्धाच्या रणांगणातसुद्धा, निर्णय घेताना भावनांवर नव्हे, तर विवेकावर आधारित कृती करावी. पायलट सुमित सभरवाल हेच उदाहरण आहे या अधुनिक ‘अर्जुन’चं. संकट समोर असतानाही त्यांनी मानसिक संतुलन न गमावता, संभाव्य प्राणहानी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला.
एक मौन, एक प्रणाम…!!
जर त्यांनी घाबरून विमान शहराच्या मध्यभागी कोसळू दिलं असतं, तर २५,००० लोकसंख्येच्या वस्तीवर मोठं संकट आलं असतं. त्यांनी वाचवलेले प्राण, हीच त्यांच्या निर्णयशक्तीची आणि शौर्याची साक्ष देतात.
स्वर्गीय श्री. सुमित सभरवाल यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या हौतात्म्याला सलाम.
वाचकांसाठी माहिती:
तुम्ही विमानप्रवास करत असाल, तर पायलट आणि क्रूच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा. संकटसमयी छोट्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आणि हो पायलट म्हणजे केवळ विमान चालवणारा नसतो, तर हजारो जिवांचं उत्तरदायित्व मनावर घेत, गरज पडल्यास आपलं आयुष्य पणाला लावणारा एक योध्दा असतो.
Adv Umesh Shahadu Marathe
Founder & Executive Director
Freelancer Election Campaign Management Company
मो.: 9673972221
https://freelancercampaign.in

No comments