उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांची रेती माफियांवर दमदार कामगिरी, ट्रॅक्टरसह आरोपी ताब्यात..! ! विरुद्ध केलेली कारवाई संभाजी...
उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांची रेती माफियांवर दमदार कामगिरी, ट्रॅक्टरसह आरोपी ताब्यात..! ! विरुद्ध केलेली कारवाई
संभाजी पुरी गोसावी (वर्धा जिल्हा) प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि 12-06-2025 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुन्ह्यामध्ये कारवाई करण्यात आली आहे, यामध्ये रेतीची अवैध वाहतूक देशी दारूची विक्री ड्रग्स तस्करी आणि मंदिरातील चोरी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अशा विविध घडणाऱ्या गुन्हेगारांवर उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांची नेहमीच करडी नजर असते. उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकांतील पोलिस. हवालदार अश्विन सुखदेवे ,पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई भारत बुटलेकर,पोलीस शिपाई राकेश इतवारे यांच्यासह आदीं पोलिस पेट्रोलिंग करीत असताना खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळाल्या माहितीवरून की (आरोपी नामे.) चालक निलेश महादेवराव ठाकरे (रा. माता मंदिर वार्ड हिंगणघाट) क्लिनर शेख इमरान शेख जब्बार, ( रा. संत चोखोबा वार्ड) हिंगणघाट हे त्यांच्या ताब्यातील बिना क्रमांकाचा लाल रंगाच्या महिंद्रा कंपनी चा ट्रॅक्टर मध्ये विना नदीच्या पात्राचे रेती घाटातून काळी रेती चोरून हिंगणघाट शहर कडे वाहतूक करीत आहे. अश्या मुखबीरचे खबरे वरुन पंच व पो.स्टॉप चे मदतीने यातील नमुद आरोपी क्र. 1 व 2 च्या ताब्यातील ट्रॅक्टर यास थांबवून चेक केले असता 1 ब्रास काडी रेती (गौण खनिज) बिना रॉयल्टी वाहतूक करताना रंगेहाथ मिळून आल्याने जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास का काळी रेती (गौन खनिज ) असा जु कि 8,06,000/- रु चा माल मिळून आल्याने पो स्टे. हिंगणघाट येथे परत येवुन आरोपीं विरोधांत गुन्हा नोंद केला .... सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे कार्यालयातील पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस नाईक रविन्द्र घाटुर्ले, पोलीस शिपाई भारत बुटलेकर,पोलीस शिपाई राकेश इतवारे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला .

No comments