बुलढाणा जिल्हा समन्वयक पदी शिक्षक निवृत्ती इंगळे यांची निवड ... अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मोताळा:- नु...
बुलढाणा जिल्हा समन्वयक पदी शिक्षक निवृत्ती इंगळे यांची निवड ...
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोताळा:- नुकतीच शिक्षक फाउंडेशन द्वारा संचालित महाराष्ट्र राज्य शिक्षक पॅनल अर्थात एस. एस .पी. द्वारे अध्यक्ष मा. श्री. दीपकजी चामे व मा. श्री. भास्करजी डोसे शेगाव यांनी एका पत्रकाद्वारे श्री. अनंतराव सराफ विद्यालय, शेलापुर तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा येथील आदर्श शिक्षक श्री निवृत्ती गोंडूजी इंगळे यांची बुलढाणा जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती केली आहे. मागील महिन्यातच श्री निवृत्ती इंगळे सर यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक पॅनल तर्फे त्यांना पॅनलचे अध्यक्ष मा.श्री.दिपकजी चामे, प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर व प्रसिद्ध कवी रोहित जी शिंगे यांचे हस्ते आदर्श शिक्षक सेवा सन्मान पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.

No comments