adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची राहाता येथे सुरुवात उत्साहात

  वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची राहाता येथे सुरुवात उत्साहात अजीजभाई शेख / राहाता: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जिल्हा शिक्षण आणि प्रशिक...

 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाची राहाता येथे सुरुवात उत्साहात


अजीजभाई शेख / राहाता:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, अहिल्यानगर व जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील राहाता तालुक्यात वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाची सुरुवात प्रसन्न व उत्साही वातावरणात  झाली. 

महाराष्ट्र शासन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणीची सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यात नुकतीच झाली. जिल्ह्यात २१४३ प्रशिक्षणार्थी सहभागी झाली आहेत. यापैकी राहाता तालुक्यातील १५५ प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण नुकतेच कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राहाता येथे सुरू झाले आहे. हे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश बनकर व जिल्हा समन्वयक अरुण भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. राहाता येथील तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रशिक्षणाचे तालुका समन्वयक डॉ. गणेश मोरे व राहाता गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे व प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप हे उपस्थित होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील व पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून दीपप्रज्वलाने झाले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीतांने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत जालिंदर गागरे यांनी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे व डॉ. गणेश मोरे यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व आणि उद्दिष्ट विशद करून प्रशिक्षणार्थींना महत्त्वाच्या सूचना केल्या व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे यांच्या हस्ते डॉ. गणेश मोरे यांचा शाल व बुके देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी राजू बनसोडे, अण्णासाहेब पडवळ, सचिन विधाते, सुनील लोमटे, दिलीप दहिफळे, तंत्रस्नेही शिक्षक अनमोल होन, कोरडे सर आदी सुलभक शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शरद दुधाट यांनी केले तर शेवटी विजय देशमुख यांनी आभार मानले.

वृत्त विशेष सहयोग

डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मिडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments