Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधधंदे निदर्शनास येतील तेथील प्रभारी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार-पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे

 ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधधंदे निदर्शनास येतील तेथील प्रभारी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार-पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे सचिन म...

 ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधधंदे निदर्शनास येतील तेथील प्रभारी अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार-पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि१८):-अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी दि.17 जून रोजी दुरदृश्य प्रणालीव्दारे (व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे) अहिल्यानगर जिल्हयातील प्रलंबित गुन्हयाचा आढावा घेवून,गुन्हयांची वेळेत निर्गती करणे,अवैध धंद्याचे उच्चाटन करणेबाबत सर्व अपर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी,सर्व पोलीस ठाणे,प्रभारी अधिकारी यांना सक्त कारवाईबाबत आदेश दिलेले आहेत.तसेच सुचना दिलेल्या आहेत की,पोलीस ठाणे येथे दाखल असलेले प्रलंबित गुन्हयांचा तात्काळ योग्यतो तपास करुन,गुन्हयांची निर्गती करणेबाबत आणि पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेवून, योग्यती कायदेशिर कारवाई करणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.विशेषत:शरिरीराविरुध्द गुन्हे करणारे आरोपी यांचेवर प्रतिबंधक कारवाई करणेबाबत विशेष सुचना देण्यात आल्या आहेत.अहिल्यानगर जिल्हा हद्दीत कोठेही अवैध धंदे ( उदा. अवैध गुटखा/सुगंधी तबांखु विक्रीे,गोमांस विक्री,अवैध दारु/ गांजा/ड्रग्स विक्री,अवैध वाळु/ गौणखनिज उपसा व विक्री, अवैध हत्यार विक्री व बाळगणे, अवैध पेट्रोलियम पदार्थ  विक्री, अवैध वाहतुक,जुगार/बिंगो/ ऑनलाईन जुगार इ.वाहन चोरी व विक्री तसेच महिला व बाल यांचे अनुषंगाने अनैतिक मानवी तस्करी,पिटा व इत्यादी ) अशा प्रकारचे अवैध धंदयाचे 100% समूळ उच्चाटन करावे.ज्या ठिकाणी अवैध धंदे चालु आहेत, अशा ठिकाणी सत्वर छापे टाकुन अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करावे.नमुद कारवाई केलेल्या ठिकाणी नियमीत भेट देऊन वारंवारं केसेस कराव्यात.अवैध व्यवसाय करणारे लोकांना कायदेशीर व्यवसाय करणेबाबबतचे समुपदेशन करावेत.प्रतिबंधात्मक कारवाई करुन,सराईत गुन्हे करणारे गुंड / गुन्हेगारांन विरुध्द आपण स्वत: वैयक्ति लक्ष घालून कडक कारदेशिर कारवाई करुन,अवैध धंदयांचे पुर्णत:उच्चाटन करावे अशा सुचना दिलेल्या आहेत. दिलेल्या सुचनाप्रमाणे केलेल्या कारवाईचा अहवाल प्रत्येक मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक हे स्वत:घेणार असलेबाबत कळविलेले आहे. पोलीस अधीक्षक यांनी नेमलेले विशेष पथकाने पोलीस ठाणे हद्दिमध्ये छापे टाकले असता, कोणत्याही प्रकारचा अवैध धंदा ज्या पोलीस ठाणे हद्दीमध्ये निर्देशनास येईल,त्यांस संबंधीत पो.ठाणेचे प्रभारी अधिकारी हे जबादार राहातील व त्यांचे विरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,अशा प्रकारे सुचना देण्यात आलेल्या आहेत. 

सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस ठाणे हद्दीत कोणतेही अवैध धंदे सुरु होणार नाहीत, याची दक्षता घेणेबाबतच्या सक्त सुचना दिलेल्या आहेत,तसेच पोलीस अधीक्षक यांनी नियुक्त केलेले विशेष पथक कार्यरत राहिल.

No comments